November 15, 2024 3:48 PM November 15, 2024 3:48 PM

views 6

आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

आपलं सरकार आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जमुई इथल्या जाहीरसभेला ते संबोधित करत होते. धरती आबा जनजाती ग्रामउत्कर्ष अभियानांतर्गत आदिवासी गावांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ८० हजार कोटी रुपये खर्च केले जातील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिवासी समाजासाठी असा उपक्रम राबविल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.   आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये बिरसा मुंडा गौरव उपवन...

October 26, 2024 8:43 PM October 26, 2024 8:43 PM

views 10

सगळ्या डॉक्टरनी आपल्या व्यावसायिक आयुष्यातली काही वर्ष  ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी व्यतित करावीत-राष्ट्रपती

सगळ्या डॉक्टरनी आपल्या व्यावसायिक आयुष्यातली काही वर्ष  ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी व्यतित करावीत असं आवाहन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. छत्तिसगड इथं नवा रायपूर इथं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि आयुषच्या पदवीदान समारंभात त्या बोलत होत्या.  छत्तिसगडसारख्या राज्यात न संपणारा औषधी वनस्पतींचा साठा आहे, त्याची माहिती मिळवण्याबरोबरच संशोधनाला चालना देण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या.   तत्पूर्वी राष्ट्रपती भिलईच्या आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान समारंभात सहभागी ...