July 2, 2025 3:10 PM July 2, 2025 3:10 PM
21
ओला, उबर यासारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची केंद्र सरकारची परवानगी
ओला, उबर, रॅपिडो यासारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. पूर्वी ही मर्यादा दीडपट होती. गर्दी नसलेल्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या किमान निम्मी रक्कम भाडे म्हणून या कंपन्यांना आकारता येईल. केंद्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं यासंदर्भातले सुधारित दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. येत्या ३ महिन्यात नव्या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्रालयानं विविध राज्यांना दिल्या आहेत. विविध वाहनांसाठी...