October 7, 2025 7:26 PM October 7, 2025 7:26 PM

views 52

एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी सकारात्मक निर्णय घेऊ, परिवहन मंत्र्यांचं आश्वासन

एसटी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं.  वेतनवाढ, महागाई भत्ता आदी मागण्यांसाठी एसटी कामगार संघटना दिवाळीपूर्वी आंदोलन करणार होत्या, त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात एसटी कामगार संघटनांसोबत बैठक झाली, त्यावेळी सरनाईक बोलत होते. कामगारांचे महागाई भत्ते, घरभाडे भत्ता आणि अन्य थकीत भत्ते, तसेच दिवाळी सण अग्रिम देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असं आश्वासन सरनाईक यांनी दिलं. महामंडळाला आर्थिकदृष्ट्या विकसित करण्याची गरज...