October 26, 2025 1:29 PM October 26, 2025 1:29 PM

views 33

सणासुदीच्या काळात दीड कोटी प्रवाशांनी घेतला विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ

सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी चालवण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ आत्तापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी घेतला आहे. उत्सवांचा हा काळ संपेपर्यंत हा आकडा अडीच कोटीपेक्षा वर जाईल, अशी अपेक्षा असल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी गुंतवणूक झाली असून विशेष गाड्यांची संख्याही विक्रमी झाली आहे, असं मंत्रालयानं नमूद केलं आहे.

August 31, 2024 3:24 PM August 31, 2024 3:24 PM

views 8

नाशिक – डहाणू ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी अडीच कोटींच्या निधीला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

नाशिक - डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्र्यंबकेश्वर आणि वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा १०० किलोमीटरचा रेल्वे मार्ग दोन प्रमुख शहरांना जोडेल. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि नाशिकमधल्या पंचवटी इथं दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वेसेवा उपलब्ध करून देत, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळं...