January 5, 2026 8:31 PM

views 17

फसवे कॉल आणि SMS रोखण्यात अपयश आल्याबद्दल ट्रायकडून मोबाइल कंपन्यांना दीडशे कोटींचा दंड

टेलिकॉम नियामक ‘ट्राय’नं स्पॅम फोन आणि मेसेज थांबवू न शकलेल्या टेलिकॉम कंपन्यांवर १५० कोटी रुपये दंड ठोठावला आहे. २०२० ते २०२३ या वर्षातल्या दिरंगाईबद्दल ही कारवाई झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारी चुकीच्या पद्धतीने बंद करणं, स्पॅम कॉल करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई न करणं यासारख्या गोष्टींसाठी ट्रायनं हा दंड ठोठावला आहे. ट्रायच्या या कारवाईला टेलिकॉम कंपन्यांनी आव्हान दिलं आहे.    

October 4, 2025 9:28 AM

views 23

खासगी रेडिओ प्रसारकांसाठी डिजिटल रेडिओ प्रसारण धोरणाकरिता शिफारशी जाहीर

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI नं खासगी रेडिओ प्रसारकांसाठी डिजिटल रेडिओ प्रसारण धोरण तयार करण्याबाबत शिफारशी जाहीर केल्या आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकता आणि चेन्नई या चार A+ श्रेणीतील शहरांमध्ये आणि हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, सुरत, पुणे, जयपूर, लखनऊ, कानपूर आणि नागपूर या नऊ A श्रेणीतील शहरांमध्ये डिजिटल रेडिओ प्रसारण सेवा सुरू करण्यासाठी राखीव किंमत निश्चित करण्याची शिफारस प्राधिकरणानं केली आहे.   नवीन प्रसारकांनी सिमुलकास्ट पद्धतीनं डिजिटल रेडिओ सेवा सुरू कराव्यात, अशी शिफारस...

September 10, 2025 2:51 PM

views 12

वितरण व्यासपीठांना मासिक, तिमाही कामगिरी अहवाल देण्याचे निर्देश : TRAI

ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणानं सर्व वितरण व्यासपीठांना आपल्या कार्याचा मासिक किंवा त्रैमासिक अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश देशातल्या सर्व डीटीएच, हेडेड इन स्काय, मल्टी सिस्टीम ऑपरेटर आणि इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हीजन ऑपरेटरना लागू होणार आहेत.   दूरसंचार मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं की, केबल टीव्ही आणि संगणक क्षेत्राची व्याप्ती वाढत असताना ग्राहक हित आणि पारदर्शकता जपण्यासाठी हे अहवाल मागवण्यात येत आहेत. सर्व ऑपरेटरांनी निर्धारित प्रारुपात हे अहवाल सादर क...

April 10, 2025 6:50 PM

views 8

TRAI : मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांना नेटवर्क कव्हरेजचे तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश

ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना नेटवर्क कव्हरेजचे तपशील संबंधित कंपनीने ट्रायच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मोबाईल नेटवर्क वापराबाबत पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने हे आदेश देण्यात आले आहेत. मोबाईल कंपन्यांनी संकेतस्थळावर नकाशांची सुविधा  त्यामुळे संबंधित कंपन्यांकडून पुरवल्या जाणाऱ्या वायरलेस किंवा ब्रॉडबँड सुविधांविषयीची माहिती ग्राहकांना त्यांच्या राहत्या परिसरातल्या नकाशाद्वारे मिळू शकेल.    

February 12, 2025 9:19 PM

views 21

Mobile Spam Call किंवा SMS ची तक्रार करायला ग्राहकांना आता आठवडाभराची मुभा

मोबाइलवर येणारे अनावश्यक कॉल किंवा SMS ची तक्रार ग्राहकांना आता ३ दिवसाऐवजी ७ दिवसापर्यंत करता येणार आहे. ग्राहकानं कॉल किंवा SMS पाठवणारा क्रमांक, याविषयी थोडक्यात माहिती, तारिख यासारखी माहिती दिली तर मोबाइल कंपन्यांना ही तक्रार ग्राह्य धरावी लागेल. आवश्यकता असेल तर या कंपन्यांनी ग्राहकांना अधिक माहिती विचारावी, असं ट्रायनं स्पष्ट केलंय. तक्रार करण्याची सुविधा मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवर ठळक पणे दाखवणे कंपन्यांना बंधनकारक असेल. या तक्रारीवर कंपन्यांना आता ३० ऐवजी ५ दिवसात कारवाई करावी लागेल. रोब...

September 30, 2024 7:11 PM

views 13

खाजगी रेडीयो प्रसारण धोरणाच्या विविध मुद्द्यांवर संबधितांच्या सूचना आणि हरकती जाणून घेण्यासंदर्भात सरकारचं नवं पाऊल

खाजगी रेडीयो प्रसारणाचे धोरणाच्या विविध मुद्द्यांवर संबधितांच्या सूचना आणि हरकती जाणून घेण्यासंदर्भात सरकारने पाऊल उचललं आहे. त्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक मंडळाने आज खाजगी रेडिओ प्रसारकांसाठी डिजिटल रेडिओ प्रसारण धोरण नियमावलीशी संबधित  विचारविनिमय टिपण प्रसिद्ध केलं आहे.  या विचारविनिमय टिपणावर संबधितांनी त्याच्या सूचना २८ ऑक्टोबरपर्यंत पाठवायच्या आहेत.  आकाशवाणीने अॅनालॉग मध्यम लहरी आणि लघु लहरी प्रसारणाचं डिजिटाझेशन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आकाशवाणीने एफ एमवर डिजिटल रेडिओ तंत्रज्ञ...

August 28, 2024 1:14 PM

views 11

फसवे संदेश आणि कॉल्सचा सामना करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी एकत्रित काम करण्याची गरज – TRAI

अवांछित संदेश आणि फसव्या कॉल्सच्या समस्येचा सामना करण्यासाठी सर्व दूरसंचार कंपन्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असं TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी म्हटलं आहे. फसवे संदेश आणि दिशाभूल करणाऱ्या फोन कॉल्स पासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी TRAI नं नियमकांच्या संयुक्त समितीची काल नवी दिल्ली इथं बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.  URLs, APKs, OTT लिंक्स आणि SMS मध्ये ‘कॉल बॅक’ नंबरच्या व्हाइटलिस्टिंग अंमलबजावणी सक्षम करण्याचं आवाहन ...

August 14, 2024 1:22 PM

views 9

‘TRAI’चे नोंदणीकृत नसलेल्या क्रमांकावरुन प्रचारासाठी करण्यात येणारे फोन थांबवण्याचे आदेश

ट्राय अर्थात दूरसंचार नियंत्रण मंडळाने नोंदणीकृत नसलेल्या क्रमांकावरुन प्रचारासाठी करण्यात येणारे फोन थांबवण्याचे आदेश सर्व सेवा पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. अनावश्यक फोन टाळण्यासाठी दूरसंचार मंत्रालयानं हे निर्बंध लावले आहेत. नोंदणीकृत क्रमांकाशिवाय कोणत्याही क्रमांकावरून असे फोन येत असल्याचं आढळल्यास फोन करणाऱ्या कंपनीला दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकलं जाणार असून या काळात त्यांना इतर कोणत्याही मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडूनही नंबर मिळवता येणार नाही.

August 13, 2024 6:18 PM

views 9

नोंदणीकृत नसलेल्या टेलीमार्केटर्स कंपन्यांकडून ग्राहकांना जाणारे जाहिरातीसाठीचे दूरध्वनी त्वरित थांबवण्याचा ट्रायच्या सूचना

नोंदणीकृत नसलेल्या टेलीमार्केटर्स कंपन्यांकडून ग्राहकांना जाणारे जाहिरातीसाठीचे दूरध्वनी त्वरित थांबवावेत अशी सूचना  ट्राय अर्थात दूरसंचार नियामक आयोगाने सर्व इंटरनेट सेवा पूरवठादार कंपन्यांना केली आहे.  दूरसंचार सेवेचा वाणिज्य उपयोजन कॉलसाठी बेकायदा वापर होत असल्यास असे वापरकर्ते इंटरनेट सेवा पुरवठादारांकडून काळ्या यादीत टाकले जावे अशी सूचना  प्रसारण मंत्रालयाने केली आहे.  सर्व इंटरनेट सेवापुरवठादारांनी नियमपालन करावं आणि दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला त्याचा अहवाल द्यावा असंही ट्रायने म्हटलं ...