November 7, 2025 2:00 PM November 7, 2025 2:00 PM

views 22

एनएसडब्ल्यू खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या रतिका सुथंतिरा सीलन हिचा उपांत्य फेरीत प्रवेश

सिडनी इथं सुरू असलेल्या एनएसडब्ल्यु खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या रथिका सुथंतिरा सीलन हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॅरन ब्लूम हिच्यावर ११-८, ११-७, ११-४ असा सरळ गेम्समध्ये विजय मिळवला.

September 20, 2025 4:00 PM September 20, 2025 4:00 PM

views 38

बॅडमिंटन मानांकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या विप्लव कुवळे आणि विराज कुवळे यांना विजेतेपद

अखिल भारतीय वरिष्ठ गट बॅडमिंटन मानांकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या विप्लव कुवळे आणि विराज कुवळे यांनी विजेतेपद पटकावलं. त्यांनी चौथी मानांकिंत जोडी सिद्धार्थ इलांगो आणि संतोष गजेंद्रन जोडीचा २१-१६, २१-१० असा पराभव केला.

January 19, 2025 2:49 PM January 19, 2025 2:49 PM

views 20

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि शुआई झँगला पुढील फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची चिनी जोडीदार शुआई झँग यांना पुढच्या फेरीत चाल मिळाली आहे. चौथ्या मानांकित ह्युगो निस आणि टेलर टाउनसेंड या जोडीविरुद्धचा त्यांचा सामना रद्द झाला.   पुरुष एकेरीच्या नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात जॅक ड्रेपर याला कार्लोस अल्काराजविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.   महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत अग्रमानांकित, बेलारूसच्या अरीना सालाबेंका हिनं १७ वर्षांच्या मिरा अँड्रीव्हा हिच्यावर ६-१, ६-२ अशी स...

January 12, 2025 1:39 PM January 12, 2025 1:39 PM

views 17

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून मेलबर्नमध्ये सुरुवात

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आज मेलबर्नमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा सुमित नागल आणि चेक रिपब्लिकचा तोमास महाच यांच्यामधल्या सामना आज संध्याकाळी साडेपाचला सुरु होईल. ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा ही टेनिस खेळातल्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक आहे.   यानिक सिन्नर, नोवाक जोकोविच, अलेक्झांडर झ्वरेव, कार्लोस अल्काराझ यांच्यांसारखे कसलेले खेळाडू यात खेळणार आहेत.

October 6, 2024 7:27 PM October 6, 2024 7:27 PM

views 26

हॉकी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष ज्युनियर संघ जाहीर

मलेशियात होणाऱ्या बाराव्या सुल्तान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष ज्युनियर संघ जाहीर झाला आहे. या संघाचा कर्णधार अमिर असून उप कर्णधार रोहित असेल. तर पी आर श्रीजेश हे मुख्य प्रशिक्षक असतील.   भारतीय संघाचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी जपानशी होणार असून भारतीय संघ दुसऱ्या दिवशी ब्रिटनशी लढत देईल. २२ ऑक्टोबरला मलेशिया आणि २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाच्या संघाशी भारतीय संघाचा सामना होणार आहे.