August 8, 2025 9:43 AM August 8, 2025 9:43 AM
6
वैद्यकीय कारणासाठी भारतात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ
जानेवारी ते एप्रिल 2025 पर्यंत भारतात वैद्यकीय उद्देशाने 1 लाख 31 हजारांहून अधिक परदेशी पर्यटकांचं आगमन झालं आहे. या कालावधीत भारतात आलेल्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी हे प्रमाण सुमारे 4 टक्के आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असून, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय 'हील इन इंडिया' मोहिमेला प्रोत्साहन देत आहे. वैद्यकीय पर्यटन परिसंस्था विकसित करण्यासाठी रुग्णालये, ...