December 12, 2024 8:06 PM December 12, 2024 8:06 PM

views 3

देशात स्वदेशी पर्यटकांची संख्येत वाढ – पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

देशात स्वदेशी पर्यटकांची संख्या २०१४ मध्ये १२० कोटी होती ती २०२३ मध्ये २५० कोटींवर पोहोचल्याची माहिती सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर देशाच्या १० हजार वर्षांच्या उत्क्रांतीचा इतिहास दाखवणारं जगातलं भव्य वस्तूसंग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.    पुढच्या वर्षी होणाऱ्या महाकुंभाच्या माध्यमातून देशाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडणार असल्याचंही ते म्हणाले.