December 27, 2024 10:38 AM December 27, 2024 10:38 AM

views 7

जलसंधारणाचं महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाणलोट यात्रा काढण्यात येणार

जलसंधारणाचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचं, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, जल व भूमी व्यवस्थापन संस्था-वाल्मीत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.   वाल्मीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ५४६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, शासनस्तरावर पाठपुरावा, अधिक अनुदान मागणी तसंच पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लावणार असल्याचं, राठोड यांनी सांगितलं.

October 16, 2024 3:01 PM October 16, 2024 3:01 PM

views 3

निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान मेक्सिको दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सीतारामन ‘टेक लीडर्स’ गोलमेज परिषदेचं अध्यक्षपद भूषवतील. या परिषदेच्या निमित्तानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारतीय दिग्गजांसह या जागतिक स्तरावरचे अनेक तज्ज्ञ आणि उद्योजक एकत्र येत आहेत.   सीतारामन मेक्सिकोचे अर्थमंत्री रोगलिओ रामिरेझ दे लाओ यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार असून संसदीय सहकार्य बळकट करण्या...