April 2, 2025 3:23 PM April 2, 2025 3:23 PM
3
टोल आकारणीत ४ ते ५ टक्क्यांची वाढ
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातल्या टोलशुल्कात ४ ते ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ तात्काळ लागू होणार आहे. हलक्या वाहनांसाठी ५ ते १० रुपये तर जड वाहनांसाठी २० ते २५ रुपयांनी टोल वाढणार आहे. कारसाठीचा मासिक पास आता ९३०वरून ९५० रुपये इतका होणार आहे. हे सुधारित दर देशभरातले राष्ट्रीय महामार्ग तसंच एक्सप्रेस मार्गांना लागू होणार आहेत.