October 9, 2025 10:04 AM October 9, 2025 10:04 AM

views 38

देशात तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीला प्रारंभ

देशभरात आजपासून तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीला प्रारंभ होणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच शिक्षण मंत्रालय संयुक्तपणे ही मोहीम राबवणार आहेत. तंबाखूमुक्त पिढी तयार करण्याचं केंद्र सरकारचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. ही राष्ट्रीय मोहिम दोन महिने सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रश्नमंजूषा, स्पर्धा, समुपदेशन यासह विविध उपक्रम आयोजित केले जातील.