January 1, 2026 10:37 AM

views 36

एक फेब्रुवारीपासून तंबाखूच्या उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू होईल

नववर्षात एक फेब्रुवारीपासून तंबाखूच्या उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पान मसाल्यावर नवीन उपकर आकारला जाणार आहे. हे कर वस्तू आणि सेवा करा व्यतिरिक्तचे कर असतील. पान मसाला, सिगारेट, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवर 40 टक्के जीएसटी दर लागू होईल, तर बिडीवर 18 टक्के वस्तू आणि सेवा कर लागेल. याव्यतिरिक्त, पान मसाल्यावर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर आकारला जाईल, तर तंबाखू आणि संबंधित उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जाईल.

December 4, 2025 6:56 PM

views 61

तंबाखू आणि तत्सम वस्तूंवर अतिरीक्त उत्पादन शुल्क लादणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी

केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला आज संसदेची मंजुरी मिळाली. यामुळं तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थांवर जीएसटी अधिभार रद्द झाल्यावर अतिरीक्त उत्पादन शुल्क लादण्याचा मार्ग मोकळा होईल.    सिगारेटवर अतिरीक्त शुल्क लादल्यानंतर मिळणारा अतिरीक्त महसूल वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांनाही दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना दिलं. अधिकाधिक शेतकऱ्यांनी तंबाखू ऐवजी इतर पीकांची लागवड करावी यासाठी सरकारनं विविध योजना ...