January 9, 2025 2:30 PM January 9, 2025 2:30 PM

views 3

तिरुपतीमधील चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू तर चाळीस जण जखमी

  आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक  व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे, आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.    चेंगराचेंगरीत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या प्रति प्रधानमंत्री मोदी यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनाग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत असल...