August 14, 2025 7:02 PM August 14, 2025 7:02 PM

views 13

राज्यात तिरंगा यात्रेचं आयोजन

७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात तिरंगा यात्रा निघत आहेत. तिरंगा यात्रेसोबतच विविध कार्यक्रम आणि उपक्रम राज्यभरात आज आयोजित करण्यात आले. यवतमाळमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांच्या मुख्य उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेतर्फे आज तिरंगा सन्मान शपथ कार्यक्रम पार पडला. कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. बीड शहरात आज तिरंगा रॅली काढण्यात आली.   धुळे शहरातून १ हजार १११ फूट लांब तिरंगा ध्वजासह पदयात्रा काढण्यात आली. पाल...

May 24, 2025 7:20 PM May 24, 2025 7:20 PM

views 13

राज्यात तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.    राज्यात धाराशिव जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिला, विद्यार्थी, वारकरी, माजी सैनिक, आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.    सोलापुरात देखील तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत महिला आणि विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक सहभागी झाले.    अहिल्यानगर मध्ये कोपरगावकरांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.  अमर जवान स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या रॅलीची सुरवात झाली.  &nbs...

May 21, 2025 1:22 PM May 21, 2025 1:22 PM

views 13

राज्यात तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.    नागपूर शहर काँग्रेस आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे 'तिरंगा यात्रा' काढली होती. यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.    लातूर जिल्ह्यातही शिवसेनेतर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यात सीमेवर सेवा बजावत असलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा तसंच सेवानिवृत्त जवानांचा सत्कार करण्यात आला.

May 20, 2025 1:30 PM May 20, 2025 1:30 PM

views 19

नांदेडमध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.   नांदेडमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहरातल्या आयटीआय मार्गावरच्या तिरंगा ध्वजापासून निघालेल्या या तिरंगा रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ करण्यात आली.    पंजाबमधल्या अमृतसर इथं आज भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते तरुण चुग यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या आणि राष्ट्रगीत गायन करण्यात आलं. देशाच्या एकतेचं प्रतीक म्हणून १०० फूट लांब...

May 19, 2025 6:57 PM May 19, 2025 6:57 PM

views 8

राज्यात तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.    रायगड जिल्ह्यात पनवेल इथं, तर ठाणे शहरात कोर्टनाका इथून तिरंगा रॅली काढली होती.     लातूर जिल्ह्यातही ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रा काढली होती.  यात्रेत माजी सैनिकांसह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.   धुळे शहरात आणि शिरपूर इथं, जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,  यवतमाळ जिल्ह्यात  पुसद इथं तिरंगा रॅली निघाली हो...

May 17, 2025 1:33 PM May 17, 2025 1:33 PM

views 6

देशात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचे आयोजन

भारतीय सेनादलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. भारतीय जनता पार्टीतर्फे आज छत्तीसगड, आणि उत्तरप्रदेशात तिरंगा यात्रा काढम्यात आली. महाराष्ट्रातही जनसामान्यांमधे ऑपरेशन सिंदूर बद्द्ल अभिमान आणि गौरवाची भावना व्यक्त होत आहे.   माजी सेनाधिकारी लेफ्टनंट जनरल कंवलजीत सिंग धिल्लाँ यांनी सेनादलांचं अभिनंदन केलं आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेच असल्याचं मत त्यांनी आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त क...

May 16, 2025 3:31 PM May 16, 2025 3:31 PM

views 8

राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन

नागपूरमधे  कामठी इथं  आज राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या सुरुवातीला बावनकुळे यांनी मुख्य चौकात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. देशातली १४० कोटी  आणि महाराष्ट्रातली  १४ कोटी जनता ही  भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे, असं ते यावेळी म्हणाले.     सोलापूर शहरात देखील आज  सकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली. पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अशोक चौकातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्या...

May 15, 2025 7:49 PM May 15, 2025 7:49 PM

views 4

देशात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान, आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भाजपातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरु आहे. २३ मेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे.    गुजरातमधे मोतीबाग टाऊन हॉल पासून शहीद मेमोरियलपर्यंत काढलेल्या भव्य तिरंगा यात्रेला केंद्रीय मंत्री निमुबेन बांभनिया यांनी झेंडा दाखवला. राज्याचे मंत्री हर्ष संघवी गांधीनगर इथल्या तिरंगा यात्रेत सहभागी झाले. जामनगरमधे ८ किलोमीटर लांबीची मिरवणूक काढण्यात आली.    जम्मू-कश्मीरमधे श्रीनगर इथं काढलेल्या तिरंगा यात्रेच...

May 14, 2025 7:30 PM May 14, 2025 7:30 PM

views 15

ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज मुंबई भाजपाने तिरंगा यात्रा काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यात सहभागी झाले होते. ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पहलगाममधे दहशतवाद्यांनी अतिशय निर्घृणपणे नागरिकांची हत्या केली. त्यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाबूत  करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले, असं मुख्यमंंत्र्यांनी सांगितलं.   पाकिस...

May 13, 2025 1:42 PM May 13, 2025 1:42 PM

views 11

भाजपतर्फे आजपासून तिरंगा यात्रेचं आयोजन

'ऑपरेशन सिन्दूर' बाबत जनजागृतीच्या उद्देशानं  भारतीय जनता पक्षानं  आजपासून देशभरात जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला त्यांनी 'तिरंगा यात्रा' असं नाव दिलं असून पाकिस्तानविरोधात भारतीय लष्करानं केलेल्या यशस्वी कारवायांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर आज संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.    या मोहिमेत माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था तसंच भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. ही मोहिम २३ मेपर्यंत चालणार असून त्यात पाकिस्तान...