August 12, 2025 7:33 PM August 12, 2025 7:33 PM

views 7

राज्यभरात तिरंगा मोहिमेंतर्गत रॅली,स्पर्धा आणि विविध उपक्रमांचे आयोजन

देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियानानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. ठिकठिकाणी तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. पनवेल महानगर पालिकेमार्फत 'हर घर तिरंगा’ मोहिम विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत नुकतीच महापालिका कार्यक्षेत्रातल्या विविध शाळा महाविद्यालयांमध्ये पत्रलेखन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, प्रतिज्ञा घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्य...