July 6, 2025 1:39 PM July 6, 2025 1:39 PM

views 5

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं हिमाचल प्रदेशात धरमशाला, कांग्रा इथं उत्सव सुरूआहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिबेटचे अध्यात्मिक गुरु परमपूज्य दलाई लामा यांना त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. परमपूज्य दलाई लामा हे प्रेम, करुणा, संयम आणि नैतिक शिस्तीचे चिरस्थायी प्रतीक आहेत असं  प्रधानमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. दलाई लामा यांच्या शिकवणीला सर्व धर्मांमध्ये आदर  आणि कौतुकाचं स्थान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.