September 17, 2025 9:02 PM September 17, 2025 9:02 PM

views 29

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस

राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस असल्याचं समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज मुंबईत सांगितलं. त्रिभाषा सुत्र समितीद्वारे वेबसाईट आणि विशेष लिंक तयार करण्यात येणार आहे. त्यावर त्रिभाषा धोरण संदर्भात मत मांडता येईल, असं ते म्हणाले. प्रश्नावाली तयार करण्याचं काम सुरू आहे. ही प्रश्नावली संबंधितांना पाठवली जाईल. राज्यातल्या ८ शहरात जाऊन स्थानिकांच्या तसंच राजकीय नेत्यांची भेटीही घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.