December 28, 2024 8:15 PM December 28, 2024 8:15 PM
2
3rdEye चित्रपट महोत्सव १० ते १६ जानेवारी दरम्यान मुंबई आणि ठाण्यात होणार
२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १० ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाणे इथं आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात ६१ चित्रपटांची निवड झाली आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधील अकरा चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार असून पत्रकार रफिक बगदादी यांना ‘सत्यजित राय मेमोरियल पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं जाणार आहे.