August 17, 2024 2:18 PM August 17, 2024 2:18 PM

views 11

ठाणे, पुणे आणि बेंगळुरूमधल्या मेट्रो प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या तीन नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज हा विस्तारित प्रकल्प; ठाणे रिंग मेट्रो आणि बंगळूरू मेट्रो प्रकल्पाचा यात समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाणे एकात्मिक रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा अंदाजित खर्च १२ हजार २०० कोटी रुपये आहे. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गासाठी २ हजार ९५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार, राज्य ...

July 18, 2024 10:35 AM July 18, 2024 10:35 AM

views 17

ऑनलाइन ठगांना शेकडो सिमकार्ड पुरवणारी टोळी ठाणे पोलिसांद्वारे गजाआड

शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून लोकांना फसविणाऱ्या टोळीला सिमकार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर कक्षानं छडा लावून छत्तीसगढमधील अफताब ढेबर याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यातील चीन आणि दुबईचाही संबंध उघड झाला असून, 779 मोबाइल सिमकार्डसह 23 मोबाइल हस्तगत पोलिसांनी हस्तगत केले.     ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी सक्रिय टोळ्यांकडून बनावट शेअर ट्रेडिंग ॲप्लिकेशन साइट्स तयार करू...

July 7, 2024 6:38 PM July 7, 2024 6:38 PM

views 8

ठाणे : जांभळी नाक्याजवळील पांडे हाऊस इमारतीचा जीर्ण भाग कोसळला

ठाणे शहरातल्या जांभळी नाक्याजवळच्या कडवा गल्लीतल्या पांडे हाऊस या धोकादायक इमारतीचा जीर्ण भाग आज सकाळी दहाच्या सुमाराला कोसळला. ही इमारत नव्वद वर्ष जुनी होती, आणि जीर्ण झालेली असल्यानं रिकामी केलेली होती. त्यामुळं सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे.

June 28, 2024 7:42 PM June 28, 2024 7:42 PM

views 13

ठाण्यात दुसऱ्या दिवशीही महापालिकेची धडक कारवाई

ठाणे शहरात आज सलग दुसऱ्या दिवशीही पब्ज, बार आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अवैध बांधकामाविरोधातली महापालिकेची धडक कारवाई सुरू राहिली.  महापालिका कार्यक्षेत्रातल्या शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटरच्या आत असलेल्या एकूण ४० पानटपऱ्या आणि हॉटेल, पब्ज, बार अशा ९ ठिकाणी  ही कारवाई झाली.