January 19, 2025 6:45 PM January 19, 2025 6:45 PM

views 9

ठाण्यात बांगलादेशी नागरिकाला अटक

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरात पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. शांतिनगर पोलीस या बांगलादेशी नागरिकाची सखोल चौकशी करत आहेत. त्याच्याकडची सर्व कागदपत्रं बनावट असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

January 19, 2025 8:16 PM January 19, 2025 8:16 PM

views 15

सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुख्य संशयिताला ५ दिवसांची पोलीस कोठडी

बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणी मुख्य संशयिताला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली असून त्याला न्यायालयानं ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्याचं नाव मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद असं असून तो मूळचा बांग्लादेशी असल्याचा संशय आहे. त्याने आधी आपलं नाव विजय दास असं सांगितलं होतं, पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याचं खरं नाव समोर आलं.    प्राथमिक पुरावे आणि त्याच्याकडे आढळलेल्या काही गोष्टींवरून तो बांग्लादेशचा नागरिक असल्याची शक्यता दिसत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे ...

January 9, 2025 3:17 PM January 9, 2025 3:17 PM

views 10

ठाण्यात उद्यापासून २१वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव सुरु

मुंबई आणि ठाण्यात उद्यापासून २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव सुरु होत असून त्याचं उद्घाटन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.   या महोत्सवात ६० हुन अधिक देशी विदेशी चित्रपट सादर होणार असून पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना एशियन कल्चर पुरस्कार प्रदान केला जाईल. हॉलिवूड चित्रपटांप्रमाणे उत्तम आशियाई चित्रपटही रसिकांपर्यंत पोहचावेत यासाठी या महोत्सवाचं आयोजन केल्याचं महोत्सवाचे संचालक संतोष पा...

January 2, 2025 2:27 PM January 2, 2025 2:27 PM

views 6

२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं आयोजन १० ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाण्यात होणार

२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं आयोजन १० ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाण्यात होणार आहे. कान चित्रपट महोत्सवात अ-सर्टन विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डाॅग’ या चायनीज चित्रपटानं या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. महोत्सवात आशियाई विभागात चीन, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, कझाकिस्तान, ट्युनिशिया, जपान, इराण, दक्षिण कोरिया आणि श्रीलंका या देशातल्या चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधल्या अकरा चित्रपटांचा समावेश आहे...

December 31, 2024 3:33 PM December 31, 2024 3:33 PM

views 10

ठाणे भिवंडी शहरातून चार बांगलादेशी नागरिकांना अटक

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरातून चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. भिवंडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली असून त्यांचा तपास सुरु असल्याची माहिती  भिवंडी शहर पोलीस आयुक्तांनी दिली. सध्या भिवंडी शहरात युद्धपातळीवर शोध मोहीम  सुरु असून गेल्या २५ दिवसात एकूण २३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे.

December 26, 2024 3:36 PM December 26, 2024 3:36 PM

views 10

ठाण्यात टेम्पोमधून ८ लाख ४२ हजार रुपयांचा गुटखा जप्त

ठाणे पोलिसांनी एका टेम्पोमधून ८ लाख ४२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. काल संध्याकाळी भिंवडीतल्या कारीवाली पोलीस चौकीत हा टेम्पो आढळला होता. त्याची तपासणी केली असता त्यातून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आढळले. ठाणे पोलिसांनी ड्रायव्हरलाही अटक केली आहे.  

December 24, 2024 3:19 PM December 24, 2024 3:19 PM

views 7

उल्हासनगर इथं झालेल्या अपघातात ५ जण जखमी

ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर इथे आज तीन गाड्यांची धडक होऊन झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. उल्हासनगरच्या व्हिनस चौकात आज सकाळी एका गाडीने आधी रिक्षाला आणि नतर एका दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. रिक्षाचालकासह दोन प्रवासी आणि दोन दुचाकीस्वार या अपघातात जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेतला कारचालक फरार झाला असून सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

December 18, 2024 5:33 PM December 18, 2024 5:33 PM

views 16

ठाणे जिल्ह्यात २३ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान क्षयरुग्ण शोध मोहीम

ठाणे जिल्ह्यात २३ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत आरोग्य विभाग,  राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरुग्ण शोध मोहीम राबवणार आहे.  ग्रामीण भागात ही मोहीम राबवण्यासाठी आशा सेविकांमार्फत योग्य नियोजन करावं असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले. टीबी हारेगा, देश जितेगा ही या उपक्रमाची संकल्पना आहे.

October 5, 2024 3:09 PM October 5, 2024 3:09 PM

views 16

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यात ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

दुपारी ठाण्यात ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो आणि घाटकोपर जवळच्या छेडा नगरपासून ठाण्यातल्या आनंद नगरपर्यंतच्या पूर्वमुक्त महामार्गाच्या विस्तारीत भागाची पायाभरणी प्रधानमंत्री करतील. याशिवाय नैना अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातल्या विकासकामांच्या पहिल्या टप्पा, ठाणे महापालिकेच्या नव...

August 17, 2024 2:20 PM August 17, 2024 2:20 PM

views 13

ठाणे, पुणे आणि बेंगळुरूमधल्या मेट्रो प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या तीन नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज हा विस्तारित प्रकल्प; ठाणे रिंग मेट्रो आणि बंगळूरू मेट्रो प्रकल्पाचा यात समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाणे एकात्मिक रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा अंदाजित खर्च १२ हजार २०० कोटी रुपये आहे. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गासाठी २ हजार ९५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार, राज्य ...