December 21, 2025 3:34 PM December 21, 2025 3:34 PM

views 12

७ लाख २६ हजार रुपयांचं मेफेड्रॉन जवळ बाळगल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यात एकाला अटक

७ लाख २६ हजार रुपयांचं मेफेड्रॉन जवळ बाळगल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यात एकाला अटक केली असल्याचं पोलिसांनी आज सांगितलं. हा आरोपी इंदौरचा रहिवासी असून शुक्रवारी उल्हासनगरमधे संशयास्पद स्थितीत फिरताना पोलिसांनी त्याला पकडलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३६ पूर्णाक ३ दशांश ग्रॅम एमडी पावडर सापडली. इंदौरमधल्या हरीश नावाच्या व्यक्तीकडून हे अंमली पदार्थ येत असल्याचं चौकशीत समजलं. त्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु असून या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेत असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

December 13, 2025 3:09 PM December 13, 2025 3:09 PM

views 18

ठाण्यात पाणीटंंचाई, ५० टक्के पाणीकपात

ठाणे शहरात आणखी चार दिवस ५० टक्के पाणीकपात केली जाणार असून शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत प्रत्येक भागास दिवसातून १२ तास झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं याकाळात नागरिकांना कमी प्रमाणात आणि  अनियमित पाणीपुरवठा होईल, असं पाणीपुरवठा विभागानं कळवलं आहे. 

December 11, 2025 2:55 PM December 11, 2025 2:55 PM

views 9

ठाणे जिल्ह्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी

दहशतवादी कारवायांना पैसा पुरवठा प्रकरणी ठाणे जिल्ह्यात पडघा इथं सक्तवसुली संचालनालय आणि दहशतवाद विरोधी पथकानं आज सकाळी छापेमारी केली.   यावेळी पडघा परिसरातल्या काही घरांमध्ये केलेल्या तपासात इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि बनावट कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं.

November 22, 2025 3:20 PM November 22, 2025 3:20 PM

views 32

राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार ८ जण जखमी

राज्यात दोन वेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमधे ८ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ आज सकाळी एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. हे सर्व जण सोलापूर जवळच्या कासेगाव-उळे इथून निघाले होते. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथं काल रात्री एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीररीत्या जखमी झाले. नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेन...

June 2, 2025 8:12 PM June 2, 2025 8:12 PM

views 25

दहशतवाद विरोधी पथकाकडून ठाणे जिल्ह्यात १२ संशयितांना अटक

दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यात छापेमारी करून १२ संशयितांना अटक केली. दहशतवाद विरोधी पथकानं साकिब नाचण, अकिब साकिब नाचण, अब्दुल लतीफ कासकर, कैफ नाचण, शाजील नाचण, फारक झुबेर मुल्ला यांच्यासह प्रतिबंधित संघटना सिम्मीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांच्या घरांची आणि परिसराची झडती घेतली. झडती दरम्यान ६ जण त्यांच्या घरात आढळले नाहीत. ए टी एस नं पुढील तपासासाठी १२ जणांना अटक केलं आहे.

May 11, 2025 8:47 PM May 11, 2025 8:47 PM

views 58

राष्ट्रीय लोक अदालत उपक्रमात ठाणे जिल्हा प्रथम स्थानी

प्रलंबित खटल्यांच्या जलद निवारणासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालत उपक्रमात ठाणे जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावर्षी दुसऱ्यांदा आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ठाणे जिल्हा न्यायालयात एकूण ९८ हजार ८९९ प्रकरणं मार्गी लागली तर एक अब्ज १२ कोटींहून अधिक रुपयांच्या प्रकरणांमध्ये यशस्वी तोडगा निघाला. यामध्ये सुमारे ३० वर्ष प्रलंबित खटल्यांचा निवडा करण्यात आला.    राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमाला मुंबईतल्या लघुवाद न्यायालयातही उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी १४८ पैकी ५८ प्...

April 25, 2025 7:08 PM April 25, 2025 7:08 PM

views 15

ठाण्यात स्पा सेंटरवर छापा

ठाणे शहरात स्पाच्या नावाखाली अवैध शरीरविक्रय व्यवसाय चालत असल्याची खबर मिळाल्यावरुन पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाने छापा टाकला.  पोलीसांनी सांगितलं की, घोडबंदर रस्त्यालगतच्या एका स्पावर कारवाई करुन ७ महिलांची सुटका केली. तर एका महिलेसह ३ जणांना अटक केली आहे. सोडवलेल्या महिलांना पुनर्वसन केंद्रात पाठवलं आहे.

April 9, 2025 7:11 PM April 9, 2025 7:11 PM

views 11

ठाण्यात भातसा नदीत बुडून तीघांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात भातसा नदीत बुडून आज ३ जणांचा मृत्यू झाला. गोठेघर वाफे इथली महिला आपला मुलगा आणि भाचीसमवेत नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असताना ही दुर्घटना झाली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. 

March 17, 2025 4:01 PM March 17, 2025 4:01 PM

views 14

ठाणे जिल्ह्यात माजी नगरसेवकाला ब्लॅकमेल करत पैसे वसूल करणाऱ्या चौघांना अटक

ठाणे जिल्ह्यात बदलापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेवकाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून जबरदस्तीनं पैसे वसूल करणाऱ्या चौघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह फोटो माजी नगरसेवकाला या चौघांनी पाठवला होता. हा फोटो समाज माध्यमावर टाकण्याची बदनामीची धमकी देत नगरसेवकाकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी माजी नगरसेवकानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत शनिवारी बदलापूरमधून ३२ वर्षांच्या एका व्यक्तीला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याच्या अन्य ती...

February 6, 2025 5:06 PM February 6, 2025 5:06 PM

views 39

ठाण्यात जलवाहिनीवर दुरुस्तीचं काम असल्याने पाणी पुरवठा मध्यरात्रीपर्यंत बंद

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागात आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून उद्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यावर पुढचे काही तास पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी या काळात नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा तसंच पाण्याचा जपून वापर करावा,असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं...