July 4, 2025 8:56 AM July 4, 2025 8:56 AM
6
राज्यात विवाहपूर्व थॅलेसिमिया रोगाची चाचणी बंधनकारक करण्याची मेघना बोर्डीकर यांची ग्वाही
राज्यात विवाहपूर्व थॅलेसिमिया रोगाची चाचणी बंधनकारक करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न विकास ठाकरे यांनी विचारला होता. प्रत्येक जिल्ह्यात या रोगावरची उपचार केंद्र सुरू केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात सिटी स्कॅन आणि एम आर आय यंत्रांचा तुटवडा अथवा बंद असलेल्या सर्व ठिकाणी या सुविधा दोन महिन्यात कार्यान्वत करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं. यासाठी चांगल्या कंपन्यांची यंत्रं खरेदी कर...