July 26, 2025 2:23 PM July 26, 2025 2:23 PM

views 2

कंबोडिया आणि थायलंडच्या सीमावर्ती भागात भारतीय नागरिकांनी प्रवास टाळावा

कंबोडिया आणि थायलंडच्या सीमावर्ती भागात सुरु असलेला संघर्ष लक्षात घेता, भारतीय नागरिकांनी या भागात प्रवास टाळावा, अशी सूचना कंबोडियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे.THAI दूतावासानं आज जारी केलेल्या निवेदनात हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेल दिला आहे. भारतीय नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणी संपर्क साधावा, असं आवाहन दूतावासानं केलं आहे. 

July 25, 2025 1:26 PM July 25, 2025 1:26 PM

views 2

थायलंड – कंबोडिया तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पर्यटकांसाठी सूचना जारी

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर थायलंडच्या भारतीय दूतावासाने तिथल्या भारतीय पर्यटकांसाठी सूचना जारी केल्या आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं. थायलंडच्या पर्यटन प्राधिकरणानं देशातल्या सात प्रांतांमधल्या अनेक पर्यटक ठिकाणांना भेटी न देण्याचा सल्ला दिला. बुधवारी झालेल्या भूसुरुंग स्फोटात थायलंडचे पाच जवान जखमी झाले. यानंतर दोन्ही देशांनी परस्परांच्या राजदूतांना पदच्युत केलं.   थायलंड आणि कंबोडिया यांच्यातल्या सीमेजवळ दोन देशांच्या लष्करांमध्ये बुधवारी झालेल्या संघ...

April 3, 2025 8:20 PM April 3, 2025 8:20 PM

views 3

भारत आणि थायलंड या देशांमध्ये ६ सामंजस्य करार

भारत आणि थायलंड यांनी आज आयटी, सागरी क्षेत्र, लघु आणि मध्यम उद्योग, हातमाग आदी क्षेत्रात सहकार्य करण्याच्या दृष्टीने सहा सामंजस्य करार  केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि थायलंडचे प्रधानमंत्री पेईतोंगटार्न शिनावात्रा यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार झाले. दोन्ही देशातली धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याचा निर्णय या चर्चेत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.   दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांमधे धोरणात्मक संवाद वाढवणं, पर्यटन, संस्कृती आणि शिक्ष...

April 3, 2025 3:24 PM April 3, 2025 3:24 PM

views 13

प्रधानमंत्री थायलंडमधल्या बँकॉक इथे पोहोचले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथे पोहोचले. विमानतळावर थायलंडचे उपप्रधानमंत्री सूर्या जुआनग्रुआंकित यांनी मोदी यांचं स्वागत केलं. थायलंडमधला भारतीय समुदायही प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं आला होता. त्यानंतर मोदी यांच्या स्वागतार्थ भरतनाट्यम आणि थायलंडच्या शास्त्रीय नृत्यशैलीचा मिलाफ दाखवणारा कार्यक्रम सादर करण्यात आला.     या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी थायलंडच्या प्रधानमंत्री पेतोंगटार्न शिनावात्र...

April 3, 2025 9:30 AM April 3, 2025 9:30 AM

views 3

दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री थायलंडला रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी थायलंडला रवाना झाले. सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. 2016 आणि 2019 नंतरचा पंतप्रधानांचा हा तिसरा दौरा आहे. ते आज संध्याकाळी थायलंडचे प्रधानमंत्री पेटोंगटार्न शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.   या प्रसंगी अनेक द्विपक्षीय करारांवर सह्याही केल्या जाणार आहेत. बिमस्टेक परिषद उद्या होणार असून, बिमस्टेक – संपन्न, लवचिक आणि खुली असं या परिषदेचं ब्रीदवाक्य आहे. या परिषदेनंतर प्रधानमंत्री मोदी उद्या श्...

March 28, 2025 8:34 PM March 28, 2025 8:34 PM

views 8

थायलंड, म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात ३ ठार, ९० जण जखमी

थायलंड आणि म्यानमारमध्ये आज झालेल्या भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळून किमान तीन जण मृत्यूमुखी पडले, तर सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अद्याप ९० जण बेपत्ता आहेत. ७ पूर्णांक ७ रिख्टर स्केलच्या या भूकंपाचं केंद्र म्यानमारमधल्या मंडालेजवळ होतं. या दुर्घटनेनंतर म्यानमार सरकारनं सहा प्रांतांमध्ये आणीबाणी लागू केली आहे. या भूकंपामुळं मंडाले इथल्या ऐतिहासिक ठिकाणांचं मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपाचे हादरे चीनच्या युनान आणि सिचुआन प्रांतातही जाणवले आणि यात काहीजण जखमी झाले आहे...

March 28, 2025 1:39 PM March 28, 2025 1:39 PM

views 2

प्रधानमंत्री येत्या ३ एप्रिलपासून थायलंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३ एप्रिलपासून थायलंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक इथे सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत ते सहभागी होती. थायलंडचे प्रधानमंत्री पेतोंगटार्न शिनावात्रा यांनी मोदी यांना या दौऱ्यासाठी निमंत्रित केलं आहे. प्रधानमंत्र्यांचा तिसरा थायलंड दौरा असेल.   या दौऱ्यात ते बिमस्टेक नेत्यांशी सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करणार आहेत. या भेटीनंतर मोदी हे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमारा दिसानायके यांच्या निमंत्रणावरून श्रीलंकेच्या तीन दिवसांच्या दौ...

August 15, 2024 8:06 PM August 15, 2024 8:06 PM

views 12

पेतोंगटार्न शिनावात्रा यांना थायलंडच्या प्रधानमंत्री पदासाठी उमेदवारी

थायलंडच्या पॉप्युलर फेउ थाई पार्टीने आज पेतोंगटार्न शिनावात्रा यांची देशाच्या प्रधानमंत्री पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली. उद्या प्रधानमंत्री पदासाठी होणाऱ्या संसदेच्या मतदानानंतर शिनावात्रा यांची निवड झाली तर त्या थायलंडच्या दुसऱ्या महिला प्रधानमंत्री बनतील. माजी प्रधानमंत्री स्रेथा थविसिन यांना काल थायलंडच्या संविधानिक न्यायालयानं पदच्युत केलं होतं. १६ वर्ष कैदेत असलेल्या माजी वकीलाची मंत्रीमंडळात नियुक्ती करुन नैतिक मूल्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे..

July 20, 2024 8:27 PM July 20, 2024 8:27 PM

views 4

महिलांच्या आशिया चषक टी 20 क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा मलेशियावर २२ धावांनी विजय

श्रीलंका इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज थायलंडने मलेशियावर २२ धावांनी विजय मिळवला. रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात थायलंडने मलेशियासमोर १३४ धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं, मात्र मलेशियाला ८ गडी गमावून १११ धावांपर्यंतच मजल मारता आली. याच मैदानावर श्रीलंका आणि बांगला देश यांच्यातला सामना सुरू झाला आहे. बांगला देशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा बांगलादेशच्या १५ व्या षटकात ६ बाद ६५ धाव...