July 9, 2025 1:12 PM July 9, 2025 1:12 PM
9
टेक्सासमध्ये पुरामुळे १०९ जणांचा मृत्यू, १६०हून बेपत्ता
अमेरिकेच्या टेक्सासला पुराचा जोरदार तडाखा बसला असून आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यू झाला असून १६० हून अधिक जण बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबट यांनी दिली. ग्वाडालूपे नदीत शोधमोहीम सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली.