November 26, 2025 8:04 PM
65
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना आणि मालिका भारतानं गमावली
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला आणि ही मालिकांही भारतानं २-० अशी गमावली. आज पाचव्या दिवशी २ बाद २७ वरून सुरू झालेला भारताचा डाव अवघा १४० धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ तर दुसऱ्या डावात २६० धावा केल्या होत्या. भारताचा संघ पहिल्या डावात २०१ तर दुसऱ्या डावात १४० धावा करून तंबुत परतला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं हा सामना ४०८ धावांनी जिंकला. दुसऱ्या डावात भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ५४ धावा केल्या. उर्वरित बहुतांश फलंदाज २० धावांच...