July 11, 2025 7:37 PM July 11, 2025 7:37 PM

views 20

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या पहिला डावात ३८७ धावा

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर संपला. ज्यो रुटनं सर्वाधिक १०४ धावा केल्या. भारतातर्फे जसप्रित बुमराहनं ५, नितीश कुमार रेड्डी आणि महंमद सिराज यांनी प्रत्येकी २, तर रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला.