April 22, 2025 6:26 PM April 22, 2025 6:26 PM

views 28

जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम इथं पर्यटकांच्या गटावर दहशतवाद्यी हल्ला

जम्मू आणि काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात पहलगाम इथे पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.   या हल्ल्यात चार पर्यटक जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्लेखोरांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराची नाकाबंदी केली असून शोधमोहीम सुरू आहे.

June 13, 2024 8:41 PM June 13, 2024 8:41 PM

views 37

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यातील ४ दहशतवाद्यांची रेखाचित्र जारी

जम्मू काश्मीर मधल्या दोडा जिल्ह्यातल्या गंडोहच्या कोटा टॉप भागात  सुरक्षा दलांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. काल रात्री झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी या भागात लपून बसलेल्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रं जारी केली आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यांना ५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.