December 11, 2025 2:55 PM December 11, 2025 2:55 PM
10
ठाणे जिल्ह्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी
दहशतवादी कारवायांना पैसा पुरवठा प्रकरणी ठाणे जिल्ह्यात पडघा इथं सक्तवसुली संचालनालय आणि दहशतवाद विरोधी पथकानं आज सकाळी छापेमारी केली. यावेळी पडघा परिसरातल्या काही घरांमध्ये केलेल्या तपासात इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि बनावट कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं.