December 15, 2024 1:54 PM December 15, 2024 1:54 PM

views 10

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणातील आरोपी हकमखान याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल

जम्मू-काश्मीरमधल्या शिव खोरी, रानसू इथून यात्रेकरूंना कटरा इथं घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणातला आरोपी हकमखान याच्याविरुद्ध एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं काल आरोपपत्र दाखल केलं. गेल्या ९ जून रोजी हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात आठ यात्रेकरू तसेच बस चालक ठार झाला होता तर ४१ यात्रेकरू गंभीर जखमी झाले होते. गोळीबारामुळे बस चालकाच्या डोक्याला गोळी लागल्यानं त्याचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस एका खोल दरीत कोसळल्यानं अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.

December 4, 2024 10:34 AM December 4, 2024 10:34 AM

views 3

बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनकडून व्यक्त

बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटननं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटक भेट देत असलेली ठिकाणं, गर्दीची ठिकाणं, सांस्कृतिक ठिकाणं आणि राजकीय सभांच्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनच्या फॉरेन कॉमनवेल्थ आणि डेव्हलमेंट ऑफिसनं वर्तवली आहे.  

August 20, 2024 9:49 AM August 20, 2024 9:49 AM

views 5

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू

जम्मू काश्मिरच्या उधमपूर जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या जवानांच्या तुकडीवर काल दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला. रामनगर भागातल्या चीलमध्ये सीआरपीएफ १८७ बटालियनवर दहशतवाद्यांनी गोळ्यांच्या ३० ते ४० फैरी झाडल्या. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे.

August 19, 2024 1:27 PM August 19, 2024 1:27 PM

views 11

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली

जम्मू काश्मीर मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.खोऱ्यातल्या बाटोटे - डोडा - किश्तवाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४४ आणि जम्मू ते श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर त्याचप्रमाणे डोडा, रामबान आणि उधमपूर जिल्ह्यात विविध सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत चेहऱ्याने ओळख पटवणारी प्रणाली, ड्रोन द्वारे गस्त त्याचप्रमाणे सीसीटीव्ही च्या माध्यमातून देशविघातक कारवायांवर लक्ष ठेवले जा...

August 18, 2024 7:00 PM August 18, 2024 7:00 PM

views 9

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वुर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वुर राणा याला भारतात पाठवण्याची परवानगी अमेरिकेच्या एका न्यायालयानं दिली आहे. भारत-अमेरिका प्रत्यार्पण कराराअंतर्गत राणाला भारताच्या ताब्यात देणं शक्य असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. भारतात पाठवण्याच्या हालचालींच्या विरोधात राणानं न्यायालयात धाव घेतली होती. सध्या तो याच प्रकरणात लॉस अँजेलिसच्या कारागृहात आहे. लष्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंध असल्याचा आरोपही तहव्वुर राणावर आहे.