May 12, 2025 9:30 AM May 12, 2025 9:30 AM

views 2

खलिस्तानी दहशतवाद्याला बिहारमधे अटक

राष्ट्रीय तपास संस्थेनं परदेशातल्या बब्बर खालसा दहशतवाद्यांशी संबंधित एका प्रमुख खलिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. मोतिहारी बिहार इथं ही कारवाई झाली. कट रचण्यात सहभाग, खलिस्तानी दहशतवाद्यांच्या साथीदारांना आश्रय देणं, रसद आणि निधी पुरवणं असे आरोप त्याच्यावर  आहेत.