September 30, 2025 10:32 AM

views 45

कॅनडाकडून ‘बिश्नोई समूह’ दहशतवादी संघटना म्हणून सुचीबद्ध

कॅनडाने बिश्नोई समूहाला फौजदारी संहितेअंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून सुचीबद्ध केले आहे. या कारवाईमुळे, कॅनडाच्या कायदा अंमलबजावणी संचालनालयामार्फत या गटाची मालमत्ता, वाहने, संपत्ती जप्त केली जाऊ शकते. त्यामुळे समूहाला होणारा वित्तपुरवठा, प्रवास आणि नवी भरती यांसंदर्भातल्या दहशतवादी गुन्ह्यांवर कारवाई करता येणार आहे. विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेल्या या समूहाकडून खंडणी वसूल करणे आणि धमकी देत दहशत निर्माण करणे अशा स्वरुपाचे गुन्हे होत असल्याचं कनडानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

April 2, 2025 10:28 AM

views 22

देशाची नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने पावलं

देश नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने मोठी पावलं उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हंटलं आहे. देशातील नक्षलवादी जिल्हयाची संख्या 12 वरुन 6 वर आणण्यात सरकारला यश आल्याचं त्यांनी नमूद केलं.   केंद्र सरकार,नक्षल चळवळी विरोधात कठोर पावलं उचलत असून, सशक्त, सुरक्षित आणि समृद्ध भारताची निर्मिती करत आहे. 31 मार्च 2026 पर्यन्त देशातून नक्षल चळवळ समूळ नष्ट होईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे.

October 6, 2024 3:48 PM

views 27

हमास दहशतवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण

गाझा पट्ट्यात हमास या अतिरेकी संघटनेनं इस्त्राईलवर हल्ला केला त्यास आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्लयात इस्‍त्राईलच्या १२०० नागरिकांचा मृत्यु झाला होता. तेव्हापासून पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. त्यात आतापर्यंत ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी जीव गमावला आहे. संयुक्‍त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी हमास संघटनेनं ओलीस ठेवलेल्या इस्‍त्रायली नागरिकांची विनाशर्त सुटका करण्याचं आवाहन केलं आहे. या युद्धामध्ये आता लेबनॉनसह इराणही सहभागी झाल्यामुळं त्याची व्याप्ती दिवसेंदिव...

September 30, 2024 9:23 AM

views 18

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातील एका दुर्गम गावात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत काल एक दहशतवादी मारला गेला. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. आकाशवाणी जम्मू प्रतिनिधीनं दिलेल्या वृत्तानुसार, काल कथुआ जिल्ह्यातील बिलावर तहसीलमधील कोगमांडली इथं झालेल्या चकमकीच्या घटनास्थळी दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. गावात दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे.

June 21, 2024 12:17 PM

views 22

लखबीर सिंग संधू दहशतवाद्याशी संबंधित प्रमुख दहशतवाद्याला अटक

बब्बर खालसा इंटरनॅशनल या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेवर कारवाई करत राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने पंजाबमधील फिरोजपूर येथून लखबीर सिंग संधू या दहशतवाद्याशी संबंधित असलेल्या, जसप्रीत सिंग या आणखी एका प्रमुख दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रास्त्र तसंच अंमली पदार्थ आणि दोन लाखांहून अधिक किमतीची रोकड आणि विविध संशयास्पद डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.

June 17, 2024 8:29 PM

views 30

उत्तर काश्मिर : सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

उत्तर काश्मिरच्या बांदीपूर जिल्ह्यातल्या अरगामा इथं सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस आणि जम्मू काश्मिर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवादी लपलेल्या ठिकाणी सुरक्षा दलाचं पथक गेलं असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या पथकानं चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.

June 17, 2024 2:25 PM

views 42

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावाही त्यांनी घेतला.   जम्मू-काश्मीरमधला दहशतवादाविरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. दहशतवाद आता नियंत्रणात असून संघटित हिंसक दहशती कृत्यांऐवजी छुप्या संघर्षाचं रूप त्याला प...