September 13, 2024 12:38 PM September 13, 2024 12:38 PM
9
जम्मू आणि काश्मीर : पूंछमध्ये एका दहशतवाद्याला स्फोटकं आणि दारूगोळ्यांसह अटक
जम्मू आणि काश्मीरमध्ये, पूंछ जिल्ह्यात सुरनकोटच्या पोथा बायपास इथं सुरक्षा दलांनी काल संध्याकाळी जम्मू आणि काश्मीर गझनवी फोर्स संघटनेच्या एका दहशतवाद्याला स्फोटकं आणि दारूगोळ्यांसह अटक केली. प्राथमिक तपासात त्याची ओळख दर्याला नौशेरा इथला रहिवासी मोहम्मद शाबीर अशी झाली आहे. तो पाकव्याप्त काश्मीर इथल्या प्रमुख दहशतवाद्याच्या संपर्कात होता. याबाबत अधिक तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.