September 12, 2025 2:02 PM September 12, 2025 2:02 PM
15
छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ माओवादी ठार
छत्तीसगढमध्ये आज सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्याच्या नैऋत्य भागात माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेवेळी माओवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. त्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. घटनास्थळावरून एक रायफल आणि स्फोटकंही जप्त करण्यात आली असून शोधमोहीम अजूनही सुरू आहे.