November 3, 2024 2:54 PM November 3, 2024 2:54 PM

views 30

एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत करण सिंग आणि फ्लोरेंट बॅक्स या भारतीय – फ्रेंच जोडीला दुहेरीचं विजेतेपद

काँगोमध्ये सुरु असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत करण सिंग आणि फ्लोरेंट बॅक्स या भारतीय - फ्रेंच जोडीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. त्यांनी इटलीच्या सिमोन आणि दक्षिण आफ्रिकेच्या अॅलेक बेकली या जोडीला सरळ सेटमध्ये पराभूत केलं. हे या जोडीचं पहिलं व्यावसायिक विजेतेपद ठरलं आहे. या विजेतेपदासोबतच करण यानं क्रमवारीतही पहिल्या पाचशे जणांमध्ये स्थान मिळवलं आहे.

October 24, 2024 2:37 PM October 24, 2024 2:37 PM

views 25

व्हिएन्ना ओपन : उपांत्य फेरीत रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन जोडीचा सामना नील स्कुपस्की आणि मिशेल व्हिनस जोडीशी होणार

व्हिएन्ना ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडन या जोडीचा सामना ब्रिटनचा नील स्कुपस्की आणि न्यूझीलंडच्या मिशेल व्हिनस या जोडीशी आज होणार आहे. सायंकाळी चार वाजून ५० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.    याआधी झालेल्या सामन्यात रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन या जोडीने रॉबीन हास आणि अलेक्झांडर झ्वेरव यांचा २-६, ७-५, १०-५ असा पराभव केला होता.  

October 20, 2024 1:48 PM October 20, 2024 1:48 PM

views 12

टेनिस : स्विझ इनडोअर टूर्नामेंटमध्ये भारताच्या सुमित नागलकडून अर्जेंटिनाच्या फाकुंदो डियाझचा पराभव

टेनिसमध्ये स्विझ इनडोअर टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या पात्रता फेरीत काल झालेल्या सामन्यात भारताच्या सुमित नागल याने अर्जेंटिनाच्या फाकुंदो डियाझ अकॉस्टा याचा ५-७, ७-६, ७-७ असा पराभव केला. दुसऱ्या पात्रता फेरीत सुमितचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ याच्याशी होणार आहे.    दरम्यान, पुरुष दुहेरीच्या उप उपांत्य फेरीत भारताचा युकी भाम्बरी आणि त्याचा जोडीदार फ्रान्सचा अल्बानो ओलिवेट्टी यांचा सामना ब्रिटनचा जो सॅलीसबरी आणि नेदरलँडचा जीन जुलियन रोजर या जोडीशी होणार आहे.

September 24, 2024 12:50 PM September 24, 2024 12:50 PM

views 7

भारताचा युकी भांबरी आणि फ्रेंचचा अल्बानो ऑलिवेट्टी चीनमध्ये खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

चीनमधे चेंगडू इथं सुरु असलेल्या खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय टेनिसपटू युकी भांबरी आणि त्याचा फ्रेंच साथीदार अल्बानो ऑलिवेट्टी अंतिम फेरीत पोहोचले आहेत. उपान्त्य फेरीत त्यांनी इव्हान डोडिग आणि राफेल मातोस या जोडीचा ६-३, ७-६,असा पराभव केला. अंतिम फेरीत त्यांची लढत दांबिया आणि रेबोल या जोडीशी आज होणार आहे.

July 12, 2024 2:53 PM July 12, 2024 2:53 PM

views 41

विम्बल्डन टेनिस : पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज होणाऱ्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत  गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार आहे. दुसरीकडे, रशियाचा पाचवा मानांकित मेदवेदेव यानं इटलीच्या अव्वल मानांकित यानिक जिनरवर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात सात वेळा विजेता असणारा सर्बियाचा द्वितीय मानांकित नोवाक जोकोविचचा सामना इटलीच्या लोरेंजो मुसेटीबरोबर होईल.  दरम्यान, महिला एकेरीच्या काल झालेल्या उपांत्य फेरीत बारबोरा क्रेचिकोवानं कजाकिस्तानच्या एलेना रबाकिना...

July 6, 2024 3:14 PM July 6, 2024 3:14 PM

views 34

विम्बल्डन टेनिस स्पर्धेतला पुरुष दुहेरी सामना आज संध्याकाळी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेतल्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन यांचा सामना जर्मनीच्या हेंड्रिक जीबीन्स आणि कॉन्स्टॅनटिन फ्रॅन्टझन यांच्याशी आज संध्याकाळी होणार आहे.   रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन यांच्या जोडीने रॉबीन हस आणि सँडर अॅरेंड्स यांना ७-५, ६-४ असं हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. पुरुष एकेरीत आज सकाळी झालेल्या सामन्यात जेनिक सिन्नर याने सर्बियाच्या मिओमीर केकमनोविच याचा ६-१, ६-४,६-२ असा पराभव करत स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश मिळव...

July 1, 2024 3:54 PM July 1, 2024 3:54 PM

views 16

टेनिस जगतातली प्रतिष्ठेची विंबल्डन स्पर्धा आजपासून रंगणार

हिरवळीच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या जगातल्या प्रतिष्ठेच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेला आजपासून लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना एस्टोनियाच्या मार्क लाजेल याच्याबरोबर होणार आहे. भारतीय खेळाडू सुमित नागलचा पुरुष एकेरीचा पहिला सामना सर्बियाच्या मियोमिर केस्मानोविक याच्याबरोबर होणार आहे. पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांचा सामना फ्रान्सच्या आद्रे मानारिनो आणि ज्योवां मेशी पेरिका या जोडी बरोबर होणार आहे...

June 23, 2024 3:08 PM June 23, 2024 3:08 PM

views 21

टेनिसपटू सुमीत नागलचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित

टेनिसपटू सुमीत नागल यानं आगामी २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. या हंगामात सुमितनं हेलबॉन चॅलेंजर आणि चेन्नई चॅलेंजर स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. यापूर्वी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुमीत दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला होता. रोहन बोपण्णा आणि एन. श्रीराम बालाजी ही जोडीही पुरुष दुहेरीत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

June 16, 2024 3:04 PM June 16, 2024 3:04 PM

views 67

भारतीय टेनिसपटू सुमित नागलचा पेरुगिया चॅलेंजर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने बनार्बे जपाटा मिरालेस या स्पेनच्या टेनिसपटूला हरवून पेरुगिया चॅलेंजर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीच्या अंतिम फेरीत मात्र भारताचा एन श्रीराम बालाजी आणि जर्मनीच्या आंद्रे बेगेमॅन या जोडीला अर्जेंटिना आणि मेक्सिको यांच्या टेनिसपटू जोडीपुढे हार पत्करावी लागली.

June 13, 2024 4:45 PM June 13, 2024 4:45 PM

views 57

पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमित नागलचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इटली इथं सुरु असलेल्या पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलनं काल पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उप उपांत्यपूर्व फेरीत त्यानं ॲलेसेंड्रो जियानेसीचा ०-६, ७-५, ७-६ असा पराभव केला. आज संध्याकाळी पुरुष दुहेरीच्या उप उपांत्य फेरीत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा जर्मन जोडीदार आंद्रे बेगेमन यांचा सामना नेदरलँड्सच्या जेस्पर डी जोंग आणि रायन निजबोअर यांच्याशी होईल.