February 21, 2025 2:43 PM February 21, 2025 2:43 PM

views 24

कतार खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा सामना ब्रिटन सोबत

कतार खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा क्रोएशियन जोडीदार इव्हान यांचा सामना ब्रिटनच्या लॉईड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश या जोडीशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा सामना सुरू होईल.   भांबरी आणि डोडिग या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या मेट पाविच आणि एल साल्वाडोरच्या मार्सेलो या जोडीवर मात केली. या सामन्यात पहिला सेट गमावल्या नंतरही दमदार पुनरागमन करत त्यांनी सामना २-६, ६-३, १०-८ असा जिंकला.

February 7, 2025 5:28 PM February 7, 2025 5:28 PM

views 9

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत सामना

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत आज साकेत मायनेणी आणि रामकुमार रामनाथन या जोडीचा सामना तैवानचा रे हो आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू ख्रिस्तोफर रोमियोस या जोडीबरोबर होणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. उपान्त्य फेरीतला दुसरा सामना जीवन नेंदुचियान आणि विजय प्रशांत या भारतीय जोडीचा सामना शिंतारो मोचीझुकी आणि कैतो युसुगी या जपानी जोडीबरोबर होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेचार वाजता सुरु होईल.

January 24, 2025 1:19 PM January 24, 2025 1:19 PM

views 18

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून नोवाक जोकोविचने माघार घेतल्याने अलेक्झांडर झ्वेरेव अंतिम फेरीत दाखल

मेलबर्न इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं दुखापतीमुळे अचानक माघार घेतली.    नोवाक जोकोविच आणि जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात  झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिला सेट ७-६ असा गमावल्यावर नोवाक जोकोविचनं स्पर्धेतून मध्येच माघार घेतली. स्पेनच्या कार्लोस अल्काराझसोबत झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात जोकोविचच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. नोवाक जोकोविचनं या स्पर्धेचं विजेतेपद सर्वाधिक १० वेळा जिंकलं आहे.    जोकोविचनं म...

January 23, 2025 1:49 PM January 23, 2025 1:49 PM

views 6

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी उपांत्य फेरीत भारत विरुद्ध स्पेन

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा महिला एकेरीचा पहिल्या सामन्यात आज अग्रमानांकित अरीना साबालेंका हिच्यासमोर स्पेनच्या पॉला बाडुसा हिचं आव्हान असेल.   तर दुसरा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली पोलंडची इगा श्वियांतेक आणि अमेरिकेची मॅडिसन कीज यांच्यात होईल. महिला एकेरीची अंतिम फेरी शनिवारी रॉड लेव्हर ॲरीना इथं रंगणार आहे.

January 20, 2025 7:24 PM January 20, 2025 7:24 PM

views 6

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या यानिक सिनरचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित इटलीचा यानिक सिनर यानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चौथ्या फेरीत त्यानं अटीतटीच्या सामन्यात डेन्मार्कच्या होल्गर रूने याच्यावर ६-३, ३-६, ६-३, ६-२ अशी मात केली. तर महिला एकेरीत सहाव्या मानांकित कझाकस्तानच्या एलेना रिबाकीना हिला पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिनं तिचा ६-३, १-६, ६-३ असा पराभव केला.

January 19, 2025 2:49 PM January 19, 2025 2:49 PM

views 20

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि शुआई झँगला पुढील फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची चिनी जोडीदार शुआई झँग यांना पुढच्या फेरीत चाल मिळाली आहे. चौथ्या मानांकित ह्युगो निस आणि टेलर टाउनसेंड या जोडीविरुद्धचा त्यांचा सामना रद्द झाला.   पुरुष एकेरीच्या नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात जॅक ड्रेपर याला कार्लोस अल्काराजविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.   महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत अग्रमानांकित, बेलारूसच्या अरीना सालाबेंका हिनं १७ वर्षांच्या मिरा अँड्रीव्हा हिच्यावर ६-१, ६-२ अशी स...

January 12, 2025 7:27 PM January 12, 2025 7:27 PM

views 40

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान संपुष्टात

ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं आज सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान पहिल्याच दिवशी संपुष्टात आलं. सुमित नागलला झेक रिपब्लिकच्या टॉमस मचाककडून  3-6, 1-6,5-7  असा पराभव पत्करावा लागला.   महिलांच्या सामन्यात बेलारुसच्या टॉप सीडेड आर्यना सबालेन्काने अमेरिकन खुल्या स्पर्धेची माजी विजेती स्लोआन स्टीफन्सवकवर 6-3, 6-2 अशी मात केली. पुरुष एकेरीत चीनचा झ्वेंग क्विएन, नॉर्वेचा कॅस्पर रुड आणि जपानचा काई निशीकोरी यांनी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

January 12, 2025 1:39 PM January 12, 2025 1:39 PM

views 17

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून मेलबर्नमध्ये सुरुवात

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आज मेलबर्नमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा सुमित नागल आणि चेक रिपब्लिकचा तोमास महाच यांच्यामधल्या सामना आज संध्याकाळी साडेपाचला सुरु होईल. ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा ही टेनिस खेळातल्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक आहे.   यानिक सिन्नर, नोवाक जोकोविच, अलेक्झांडर झ्वरेव, कार्लोस अल्काराझ यांच्यांसारखे कसलेले खेळाडू यात खेळणार आहेत.

January 11, 2025 8:43 PM January 11, 2025 8:43 PM

views 15

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला उद्यापासून मेलबर्नमध्ये सुरु

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला उद्यापासून मेलबर्नमध्ये सुरुवात होणार आहे. यानिक सिनर, नोवाक जोकोविच, अलेक्झांडर झ्वेरेव, कार्लोस अल्काराज, ॲरीना साबालेंका, इगा श्वियांतेक यासारखे बडे खेळाडू विजेतेपदासाठी लढत देतील. रोहन बोपन्ना, युकी भांब्री, श्रीराम बालाजी आणि रित्विक बोल्लीपल्ली हे भारतीय खेळाडू यात सहभागी होत आहेत. 

November 24, 2024 2:48 PM November 24, 2024 2:48 PM

views 24

टेनिस : भारताच्या एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोल्लीपल्ली जोडीनं एटीपी चॅलेंजर टूर स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं

भारताचे टेनिसपटू एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोल्लीपल्ली या दोघांनी इटली इथं झालेल्या एटीपी चॅलेंजर टूर स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. त्यांनी काल झालेल्या अंतिम फेरीत द्वितीय मानांकित जोडीवर ६-३, २-६, १२-१० अशी मात केली. एटीपी चॅलेंजर टूरमधलं ऋत्विकचं हे दुसरं, तर बालाजीचं पहिलंवहिलं जेतेपद आहे.