April 10, 2025 2:35 PM

views 19

Monte-Carlo Masters :स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि बेन शेल्टन यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

टेनिसमध्ये, रोहन बोपण्णा आणि बेन शेल्टन यांनी मोंटे-कार्लो मास्टर्स स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या इंडो-अमेरिकन जोडीनं तिसऱ्या मानांकित इटालियन जोडी सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावसोरी यांना एका रोमांचक सामन्यात २-६, ७-६, १०-७ असं पराभूत केलं. बोपण्णानं पाब्लो क्यूवास याच्यासोबत २०१७ मध्ये मोंटे-कार्लो मास्टर्स किताब जिंकला होता. पुरुषांच्या एकेरीत, चिलीच्या अलेजांद्रो ताबिलोनं दुसऱ्या फेरीत २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता नोवाक जोकोविचचा ६-३, ६-४ असा पराभव केला.

February 3, 2025 2:07 PM

views 17

मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेत भारताची अग्रमानांकित सहजा यमलापल्ली हिचा सामना आज थायलंडच्या लानलाना तारारुडी हिच्याशी होणार

मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत भारताची अग्रमानांकित सहजा यमलापल्ली हिचा सामना आज थायलंडच्या लानलाना तारारुडी हिच्याशी होणार आहे. संध्याकाळी साडेचार वाजता हा सामना सुरू होईल. तर उद्या अंकिता रैना हिच्यासमोर देशभगिनी वैष्णवी अडकर हिचं आव्हान असेल. मिश्र दुहेरीत भारताची प्रार्थना ठोंबरे आणि नेदरलँड्सचा अरियान हारतोनो ही जोडी थायलंड आणि जपानच्या जोडीशी लढत देईल.    

July 16, 2024 12:25 PM

views 23

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलची स्वीडनच्या एलियास यमरशी लढत

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीच्या फेरीत भारताच्या सुमित नागलची लढत स्वीडनच्या एलियास यमरशी होणार आहे, तर पुरुष दुहेरीच्या लढतीत आज संध्याकाळी सुमित नागल आणि पोलंडच्या कॅरोल ड्रझेविकी या जोडीचा सामना फ्रान्सच्या अलेक्झांड्रे म्युलर आणि लुका व्हॅन अशे या जोडीशी होईल. भारतीय टेनिसपटू सुमितनं या मोसमात हेलब्रॉन चॅलेंजर आणि चेन्नई चॅलेंजरसह दोन विजेतेपदं जिंकली आहेत.