November 16, 2025 4:20 PM November 16, 2025 4:20 PM

views 16

टेनिसमध्ये एटीपी फायनल अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकित कार्लोस अल्काराजसमोर यानिक सिनर याचं आव्हान

टेनिसमध्ये एटीपी फायनल अजिंक्यपद स्पर्धेत आज अग्रमानांकित कार्लोस अल्काराज याच्यासमोर यानिक सिनर याचं आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेदहा वाजता हा सामना ट्युरिन इथं सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कार्लोस अल्काराज यानं फीलिक्स ऑजर अलियासीम याच्यावर ६-२, ६-४ अशी मात केली होती, तर यानिक सिनर यानं ॲलेक्स डीमिनॉर याचा ७-५, ६-२ असा पराभव केला होता. अल्काराज आणि सिनर या दोघांनीही टेनिसच्या या हंगामात आपलं वर्चस्व कायम राखलं आहे.

November 9, 2025 2:08 PM November 9, 2025 2:08 PM

views 30

टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनं एटीपी अंतिम फेरीतून घेतली माघार

सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यानं एटीपी २५० अथेन्स गटाचं विजेतेपद पटकावल्यानंतर तासाभरातच खांद्याच्या दुखापतीमुळे एटीपी अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. हंगामातली ही शेवटची फेरी असून ती चुकण्याचं त्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. जोकोविचनं अथेन्स स्पर्धेत लॉरेन्झो मुसेटी याच्यावर ४-६, ६-३, ७-५ अशी मात करून आपल्या कारकीर्दीतलं १०१ वं, तर हार्डकोर्टवरचं ७२ वं विजेतेपद पटकावलं आणि हार्डकोर्टवर सर्वाधिक विजेतेपदांचा रॉजर फेडरर याचा विक्रम मोडीत काढला. आता जोकोविचनं एटीपीतून माघार घेतल्यामुळं त्याच्य...

November 1, 2025 8:12 PM November 1, 2025 8:12 PM

views 43

टेनिसपटू रोहन बोपण्णाची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती

भारताचा अग्रणी टेनिसपटू रोहन बोपण्णा यानं व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बोपण्णानं समाजमाध्यमावर ही घोषणा केली आहे. २० वर्षांच्या कारकिर्दीनंतर आता आपण रॅकेट खाली ठेवण्याची वेळ आल्याचं त्यानं म्हटलं आहे. 

October 26, 2025 7:44 PM October 26, 2025 7:44 PM

views 37

ITF J30 स्पर्धेत भारताच्या सृष्टी किरणनं विजेतेपद पटकावलं

भारताची सृष्टी किरण हिनं डॉमिनिकन रिपब्लिक मधल्या कॅबारेते इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या जे थर्टी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विजेतपदासह तिनं कनिष्ठ गटातलं पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावे केलं आहे.   सृष्टी हीनं अंतिम फेरीत व्हेनेझुएलाच्या  स्टेफनी पुमार हिचा ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

September 8, 2025 2:44 PM September 8, 2025 2:44 PM

views 16

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराजनं पटकावलं जेतेपद

भारताच्या पुरुष हॉकी संघानं काल आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अजिंक्यपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियावर ४-१ असा विजय मिळवला. भारताकडून दिलप्रीत यानं दोन, तर सुखजीत आणि अमित रोहिदास यांनी प्रत्येकी एक गोल केला. या विजयासोबतच भारताचा संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.   या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचं अभिनंदन केलं. गतविजेत्या दक्षिण कोरियाला भारतानं हरवल्यामुळे हा विजय आणखी विशेष असल्याचं प्रधानमंत्र्या...

July 5, 2025 4:07 PM July 5, 2025 4:07 PM

views 26

विंम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंचे सामने होणार

विंम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत. पुरुष दुहेरीत आज युकी भांब्री आणि अमेरिकेचा रॉबर्ट गैलोवे यांच्या जोडीचा सामना पोर्तुगालच्या नूनो बोर्गेस आणि अमेरिकेच्या मार्कोस गिरोन या जोडीशी होणार आहे. तर भारताच्या एन.श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोच्या मिगुएल एंजल रेयेस-वरेला या जोडीचा सामना अर्जेंटिनाच्या होरासिओ झेबालोस आणि स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सशी होईल. भारताचा रित्विक चौधरी बोलिपल्ली आणि कोलंबियाचा निकोलस बॅरिएंटोस ही जोडी ब्रिटनच्या जो सॅलिसबरी आणि नील स्कुप्सकी यांच्य...

June 30, 2025 1:21 PM June 30, 2025 1:21 PM

views 17

टेनिस जगतातल्या प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धेला आजपासून प्रारंभ

टेनिस जगतातल्या प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. १३ जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विद्यमान विजेता कार्लोस अल्कराज, नोवाक जोकोविच या खेळाडूंसह चार भारतीय टेनिसपटू सहभागी होत आहे. यामध्ये रोहन बोपण्णा, युकी भांबरी, ऋत्विक बोलिपल्ली आणि श्रीराम बालाजी यांचा समावेश आहे. हे सर्वजण आपापल्या परदेशी जोडीदारांसोबत पुरुष दुहेरीत खेळणार आहेत.

June 22, 2025 2:49 PM June 22, 2025 2:49 PM

views 13

ITF J200 Gladbeck टेनिस स्पर्धेत भारताच्या माया राजेश्वरनला विजेतेपद

भारताची युवा टेनिसपटू माया राजेश्वरन हिनं जर्मनीत आयोजित आईटीएफ कनिष्ठ गट दोनशे, ग्लेडबेक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सोळा वर्षीय मायानं अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या नोलिया मान्तान हिचा ६-२, ६-४ असा सहज पराभव केला. मायाचं आईटीएफ कनिष्ठ गट स्पर्धेतलं हे पहिलंच विजेतेपद आहे.

March 28, 2025 3:38 PM March 28, 2025 3:38 PM

views 16

मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविच उपांत्य फेरीत दाखल

मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज सर्बियाच्या नोवाक जोकोविचने अमेरिकेच्या सेबास्टियन कोर्डा याला ६-३, ७-६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा जोकोविच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.   त्याने रॉजर फेडरर याचा २०१९मधे मियामी स्पर्धेच्या अंतिम चार खेळाडूंमधे स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू हा विक्रम मोडीत काढला आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जोकोविचची गाठ बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्ह बरोबर पडेल. भारतीय वेळेनुसार आज रात्री बारा व...

February 22, 2025 8:03 PM February 22, 2025 8:03 PM

views 23

Pune ATP Challenger: जीवन नेदुंचेझियन आणि विजय सुंदर प्रशांत जोडीला विजेतेपद

पुणे ओपन चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या जीवन नेदुंचेझियन आणि विजय सुंदर प्रशांत या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक बायल्डन आणि मॅथ्यू ख्रिस्तोफर रोमियोस यांचा ३-६, ६-३, १०-० असा पराभव केला. अंतिम फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीची सुरुवात संथ झाली. त्यामुळे त्यांनी पहिला सेट ३-६ असा गमावला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत टायब्रेक करण्यात आला. निर्णायक टायब्रेकमध्ये, भारतीय जोडीने एकही गुण न गमावता सेट १०-० असा जिंकला.