July 11, 2025 7:28 PM July 11, 2025 7:28 PM
14
शनी शिंगणापूर देवस्थानातही सरकारची समिती नेमण्याचा राज्य सरकारचा विचार
शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानात मंदीर समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत दिली. यासाठी कायदा करण्याची सरकारची तयारी आहे. या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने कारभारात केलेल्या अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करायचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शनिशिंगणापूर देवस्थानाचे बनावट ॲप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी सायबर खात्याच्या पोलीस उपमहानिरीक्षकांच्या देखरेखीखाली चौकशी आणि कारवाई करू, असंही ते म्...