August 29, 2024 1:52 PM August 29, 2024 1:52 PM

views 12

टेलिग्राम ॲपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॉवेल दुरोव्ह यांची जामीनावर सुटका

टेलिग्राम एपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॉवेल दुरोव्ह यांची जामीनावर सुटका झाली आहे. पॅरिसचे सरकारी वकील लॉर बेको यांनी सांगितलं की दुरोव्ह यांना पन्नास लाख युरो भरल्यावर जामीन मिळाला असून चौकशी पूर्ण होईपर्यंत फ्रान्समधून बाहेर जायला मनाई करण्यात आली आहे. टेलिग्राम माध्यमावर खंडणी, धाकदपटशा, विकृत मजकूर प्रसिद्ध करणे, दहशतवादाचं उदात्तीकरण करणे, अशा प्रकरचे गुन्हे करणाऱ्यांना अटकाव केला नसल्याचा आरोप दुरोव्ह यांच्यावर आहे.  गेल्या शनिवारी फ्रेंच पोलिसांनी दुरोव्ह यांना पॅरिस विमानतळ...

August 25, 2024 12:27 PM August 25, 2024 12:27 PM

views 6

टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्यूरोव यांना अटक

टेलिग्राम या संदेशवाहक ऍप्लिकेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्यूरोव यांना फ्रान्समध्ये पॅरीस इथं काल अटक करण्यात आली. टेलिग्राम या समाजमाध्यमावर गुन्हेगारी कारवायांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी नियंत्रक नेमलेला नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं, त्या अंतर्गत ही  अटक केल्याचं फ्रान्समधल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.