September 11, 2024 8:26 PM September 11, 2024 8:26 PM

views 12

तेलंगणा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची केंद्रीय समिती पाहणी करणार

तेलंगणा राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सहा सदस्यीय केंद्रीय समिती लवकरच पाहणी करणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव कर्नल कीर्ती प्रताप सिंग हे या समितीचं नेतृत्व करतील. समितीनं आज सकाळी हैदराबाद इथल्या सचिवालयातल्या जेष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी आणि तेलंगणा राज्याच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांच्याशी चर्चा केली. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा उशिरा मिळूनदेखील प्रशासनानं जय्यत  तयारी ठेवली होती आणि प्रशासनानं केलेली शीघ्र  कृतीमुळे फारशी मनुष्यहानी झाली न...

September 6, 2024 10:24 AM September 6, 2024 10:24 AM

views 3

आंध्रप्रदेश आणि तेलंगणतील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध – कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

आंध्रप्रदेशात आलेल्या पुरामुळे अंदाजे दीड लाख हेक्टरहून जास्त क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून, २ लाख शेतकाऱ्यांना फटका बसला आहे असं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हंटलं आहे. विशेषत: हळद आणि फूल पिकांना अतिवृष्टीची झळ बसल्याचं त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील पूरस्थितीची पाहणी करण्याकरता चौहान कालपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी विजयवाडा, प्रकाशम धरण तसंच कृष्णा नदी लगतच्या पूरग्रस्त शेतांची हवाई पाहणी केली. पंचनामे करण्याची प्रक्रिया सुर...

September 3, 2024 3:15 PM September 3, 2024 3:15 PM

views 20

तेलंगणाच्या काही भागात पावसाचा जोर कायम

तेलंगणाच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. खम्मम, महबूबाबाद आणि सूर्यापेट या जिल्ह्यांमधल्या पूरग्रस्त भागात एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं बचाव कार्य सुरु आहे. राज्य सरकारनं  ११० मदत छावण्या उभारल्या असून या ठिकाणी ४ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी आसरा घेतला आहे. पुरामुळे आतापर्यंत ५ हजार ४०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.   तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी काल पुराचा फटका बसलेल्या  खम्मम या भागाला भेट दिली. पुरामुळे सर्वाधिक बाधित  ५ जिल्ह्यांना...

September 2, 2024 8:23 PM September 2, 2024 8:23 PM

views 16

तेलंगणामध्ये अतिवृष्टीमुळं १६ जणांचा मृत्यू

तेलंगणामध्ये अतिवृष्टी मुळे किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री डी श्रीधर बाबू यांनी आज हैदराबादमध्ये प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. खम्मम, महबूबाबाद आणि सूर्यपेटच्या काही भागांत  परिस्थिती अजूनही गंभीर आहे. पाऊस आणि संबंधित घटनांमध्ये मृतांच्या नातेवाईकांना सरकारने तात्काळ मदत जाहीर केली आहे, असं डी श्रीधर बाबू यांनी म्हटलं आहे.

September 2, 2024 9:34 AM September 2, 2024 9:34 AM

views 23

आंध्र प्रदेश, तेलंगणमधील पूरस्थितीचा प्रधानमंत्र्यांनी घेतला आढावा

  प्रधानमंत्रीं नरेंद्र मोदी यांनी काल आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करुन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही राज्यांना शक्य ती सर्व मत करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं आहे. राज्य सरकार युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहे. विजयवाडा जिल्ह्यात पुरामुळे बुडामेरू ओढ्याला तडा गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना अन्न, पाणी आणि आवश्यक औषधांचा व्यवस्थित पुरवठा करावा असे आदेश अधिका...