January 5, 2025 9:16 AM January 5, 2025 9:16 AM
5
शेतजमिनीसाठी प्रतिएकर १२,००० रुपये देण्याचा तेलंगणा मंत्रिमंडळाचा निर्णय
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी रायथू भरोसा योजनेंतर्गत शेतजमिनीसाठी प्रति एकर १२,००० रुपये देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १०,००० रुपयांच्या मदतीमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना या प्रस्तावित योजनेअंतर्गत भूमिहीन शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष १२ हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, काँग्रेस पक्षानं रयथू भरोसा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवण...