July 1, 2025 1:32 PM

views 6

तेलंगणा औषधनिर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटात मृतांची संख्या ३५ वर

तेलंगणातल्या संगारेड्डी जिल्ह्यात पाशमाइलाटम या औषधनिर्माण कारखान्यात काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या ३५ झाली आहे. मृतांपैकी ११ जणांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारखान्यातील ढिगाऱ्याखाली आणखी १६ कामगार अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  NDRF आणि SDRF पथके दिवसरात्र काम करत आहेत.    दरम्यान, स्फोटात होरपळून गंभीर जखमी झालेल्या ३५ कामगारांना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं असून १२ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमी कामगारांपैकी बहुतेकजण ओदिशा, उत्तर प्रदेश आणि बिहारचे आ...