November 3, 2025 1:41 PM November 3, 2025 1:41 PM

views 21

तेलंगणात रस्ते अपघातात १९ जणांचा मृत्यू, २० जखमी

तेलंगणामध्ये रंगारेड्डी जिल्ह्यात चेवेल्लाजवळच्या मिर्जागुडा-खानापूर रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला. विकाराबाद-हैदराबाद मार्गावर सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना एका ट्रकनं आरटीसी बसला धडक दिल्यामुळे ही घटना घडली. विकाराबादच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आलं. तसंच २० जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.   अपघाताची माहिती मिळण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी राज...

April 6, 2025 1:01 PM April 6, 2025 1:01 PM

views 3

तेलंगणामध्ये ८६ नक्षलवादी शरण

तेलंगणात काल वीस महिलांसह ८६ नक्षलवादी पोलिसांना शरण आले. नक्षलग्रस्त भागात शांतता आणि सामान्य जनजीवन प्रस्थापित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमधला हा एक मोठा टप्पा आहे. शरण आलेल्यांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये देण्यात आले. या नक्षलवाद्यांनी विशेषतः त्यांच्यातल्या महिलांनी यापुढे शांतता आणि विकासाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं तेलंगणाचे पोलीस महासंचालक चंद्रशेखर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, आंध्र प्रदेशातही ११ माओवादी पोलिसांना शरण आले...

March 15, 2025 9:09 PM March 15, 2025 9:09 PM

views 12

तेलंगणामध्ये ६४ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

तेलंगणा मध्ये बंदी घातलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी- माओवादी या संघटनेच्या ६४ सदस्यांनी आज भद्रादि कोठागुडम जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यात ४८ पुरुष तर १६ महिला माओवाद्यांचा समावेश आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यात आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची संख्या १२२ वर पोहोचली आहे. 

February 23, 2025 8:11 PM February 23, 2025 8:11 PM

views 10

तेलंगणामध्ये बोगदा प्रकल्पात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य तीव्र

तेलंगणामध्ये नगरकुरनूल जिल्ह्यात श्रीशैलम लेफ्ट बँक कनॉल बोगदा प्रकल्पात अडकलेल्या कामगार आणि अभियंत्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य तीव्र करण्यात येत आहे. या बोगद्याचा काही भाग काल सकाळी कोसळल्याने आठ कर्मचारी अडकून पडले. चिखल, पाणी आणि गाळामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचायला बचाव पथकाला अडचणी येत असल्याची माहिती तेलंगणाचे पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांनी दिली आहे. कर्मचारी अडकून पडलेला बोगद्याचा भाग हा धोकादायक स्थितीत असून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ढिगारा काळजीपूर्वक उपसावा लागत असल्याची माहित...

January 26, 2025 8:03 PM January 26, 2025 8:03 PM

views 6

तेलंगणामध्ये रस्ता अपघातात ५ जण ठार, ६ जखमी

तेलंगणाच्या वारंगळ जिल्ह्यात मामुनरु महामार्गावर झालेल्या एका रस्ता अपघातात ५ जण ठार झाले असून ६ जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.    लोखंडाच्या सळ्या घेऊन जाणारा एक ट्रक मधल्या सळ्या बांधलेली दोरी अचानक तुटल्यानं चालकाचं ट्र्कवरच नियंत्रण सुटलं आणि तो विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दोन रिक्षांवर आदळला. या अपघातात रिक्षातील प्रवासी जागीच मृत्यूमुखी पडले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे ...

December 4, 2024 2:23 PM December 4, 2024 2:23 PM

views 10

तेलंगणातल्य़ा अनेक भागात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

तेलंगणातल्य़ा अनेक भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्का जाणवले. रिक्टर मापकावर त्याची तीव्रता पाच पूर्णांक तीन दशांश नोंदली गेली. सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी जाणवलेल्या या भूकंपाचं केंद्र मुलुगु जिल्ह्यात होतं. करीमनगर, पेद्दापल्ली, जनगाव,महबूबाबाद, हनुमकोंडा वरंगळ, आणि भद्राद्री कोथागुडम या जिल्ह्यांमधे हा धक्का जाणवल्याचं राष्ट्रीय भूगर्भ संशोधन केंद्रानं सांगितलं. भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागातही हा धक्का जाण...

December 1, 2024 7:18 PM December 1, 2024 7:18 PM

views 8

तेलंगणात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार

तेलंगणात, मुलुगु जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत किमान सात जहाल नक्षलवादी ठार झाले. या नक्षल्यांमध्ये राज्य समितीचा सचिव भद्रू उर्फ ​​पपण्णा हा विजापूरचा असून इतर दोन राज्य समिती सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांचे खबरे असल्याचं सांगून त्यांनी दोन आदिवासींना ठार मारल्यानंतर काही वेळातच ही चकमक झाली. एटुरनगरम भागात नक्षलविरोधी कमांडो पथकाला आज सकाळी शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दोन एके-४७ रा...

November 17, 2024 3:13 PM November 17, 2024 3:13 PM

views 4

तेलंगणामधल्या मुसी पुनरुज्जीवन प्रकल्पाला विरोध म्हणून भाजपाचं ‘मुसी निद्रा’ आंदोलन

तेलंगणामधल्या मुसी पुनरुज्जीवन प्रकल्पाला विरोध म्हणून भाजपाने काल ‘मुसी निद्रा’ आंदोलन केलं. भाजपा नेत्यांनी या आंदोलना अंतर्गत मुसी नदी परिसरातल्या गरीब कुटुंबासोबत एक रात्र मुक्काम केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष किशन रेड्डी यांनी सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातल्या तुलसीराम नगर इथल्या कुटुंबासोबत मुक्काम केला. राज्य सरकार मुसी नदी परिसरातली गरीबांची घरं विस्थापित करण्याची योजना आखत आहे, मात्र भाजपा इथल्या रहिवाश्यांच्या सोबत आहे, असं रेड्डी म्हणाले.

September 28, 2024 1:07 PM September 28, 2024 1:07 PM

views 9

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज एक दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज एक दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या हैद्राबाद इथल्या नालसार विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते आज सिंकदराबाद इथल्या राष्ट्रपती निलायम मधील भारतीय कलामहोत्सवाचं उद्घाटन करण्यात येईल. आठ दिवस चालणाऱ्या या कलामहोत्सवात ईशान्येकडच्या राज्यातल्या कला, हस्तकला आणि पाककला सादर केल्या जाणार आहेत. या महोत्सवात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरातले कलाकार सहभागी होणार आह...

September 19, 2024 1:23 PM September 19, 2024 1:23 PM

views 12

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी तेलंगणाचं MSME धोरण जाहीर

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी तेलंगणानं काल नवीन MSME धोरण जाहीर केलं. याअंतर्गत येत्या ५ वर्षात ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या मुळे दलित, महिला यांच्यासह MSME ला प्रोत्साहन मिळेल, असं मुख्यमंत्री  रेवंथ रेड्डी म्हणाले.