October 19, 2025 3:04 PM October 19, 2025 3:04 PM

views 26

इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं काँग्रेसचं आवाहन

बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं आवाहन काँग्रेसनं केलं आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली. मात्र इंडिया आघाडीचं जागावाटपाचं सूत्र जाहीर झालं नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अनेक मतदारसंघात काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत. दुसऱ्या टप्प्यातल्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपत आहे. या टप्प्यातल्या कुटुंब मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्...