October 17, 2025 8:29 PM October 17, 2025 8:29 PM
41
पहिल्या ‘तेजस’ विमानाचं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकापर्ण
नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत झालं. या विमानानं यावेळी आकाशात उड्डाण केलं. ओझरमधल्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी तेजस एमके वन ए या लढाऊ विमानाच्या उत्पादन साखळीचंही लोकार्पण केलं. भारताला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. नाशिकमध्ये तयार झालेल्या सुखोई-३०, एलसीए आणि एचटीटी-४० विमानांच्या उड्डाणांचं राजनाथ सिंह यांनी कौ...