November 12, 2025 7:48 PM November 12, 2025 7:48 PM

views 27

अंध महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियावर २०९ धावांनी विजय

नवी दिल्लीत सुरू असलेल्या पहिल्या अंध महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं ऑस्ट्रेलियाचा २०९ धावांनी पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आणि निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून २९२ धावा केल्या. कर्णधार दीपिका हिने ९१ तर फुला सरेन हिने ५४ धावांची दमदार खेळी केली.    भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ८३ धावांतच गारद झाला. जमुना राणी हिनं चार, तर अनु कुमारी आणि काव्या व्ही. यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.