November 2, 2025 6:49 PM November 2, 2025 6:49 PM

views 31

3rd T20: भारताचा ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय

भारत-ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज ऑस्ट्रेलियात होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १८६ धावा केल्या. टीम डेव्हिडनं ७४, तर मार्कुस स्टॉइनिसनं ७४ धावा केल्या. भारतातर्फे अर्शदीप सिंगनं ३, तर वरुण चक्रवर्तीनं २, तर शुभम दुबेनं एक गडी बाद केला.   भारतानं ५ गडी गमावून १८८ धावा करत, सामन्यातले ९ चेंडू बाकी असताना  विजयी लक्ष्य ...

September 29, 2025 1:33 PM September 29, 2025 1:33 PM

views 68

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत नवव्यांदा अजिंक्य

आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत काल अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत आशिया चषकाला नवव्यांदा गवसणी घातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.   नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यामुळे पाकिस्तानचा डाव १४६ धावांमध्ये आटोपला. भारताच्या तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्यातील अर्धशतकी भागीदारीमुळे भारताला दोन चेंडू शिल्लक असताना विजय मिळाला. कुलदीप यादवनं चार गडी बाद करून संपूर्ण मालिकेत सर्व...

July 10, 2025 9:32 AM July 10, 2025 9:32 AM

views 12

महिला T20 पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची विजयी आघाडी

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान ब्रिटनमध्ये काल झालेल्या मर्यादित 20 षटकांच्या चौथ्या सामन्यात, भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 20 षटकांत 7 बाद 126 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, भारतीय महिलांनी केवळ 17 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले, सलामीवीर स्मृती मानधनाने 32 धावा आणि शफाली वर्माने 31 धावांचे योगदान दिलं.

June 6, 2025 3:27 PM June 6, 2025 3:27 PM

views 31

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आज रवाना झाला. या दौऱ्यात ५ कसोटी सामने होणार असून ते २०२५-२०२७ च्या आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा भाग आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरचा हा भारतीय संघाचा पहिलाच कसोटी दौरा आहे. शुभमन गिल कडे नेतृत्वाची धुरा आहे. २००७ पासून भारताने इंग्लंडबरोबर कसोटी सामना जिंकलेला नाही

March 23, 2025 1:01 PM March 23, 2025 1:01 PM

views 60

Basketball : भारतीय संघ फिबा पुरुष एशिया चषक स्पर्धेसाठी पात्र

भारतीय बास्केटबॉल संघ फिबा पुरुष एशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. संघानं काल रात्री मनामा इथं झालेल्या सामन्यात यजमान बहारिनचा ८१ - ७७ असा पराभव केला. भारताकडून हर्ष डागर, गुरबाज संधू, कंवर संधू, प्रणव प्रिंस आणि हाफिज यांनी शानदार खेळ केला. आता, भारतीय संघ ५ ते १७ ऑगस्टदरम्यान सौदी अरेबियात जेद्दाह इथं कॉन्टिनेंटल स्पर्धा खेळेल.

February 26, 2025 10:56 AM February 26, 2025 10:56 AM

views 16

FIH हॉकी : भारतीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानी

एफआयएच हॉकी लीग स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर इंग्लंडवर 2-1 असा विजय मिळवला. हरमनप्रीतनं धडाडीनं नेतृत्व करत दोन वेळा गोल करून भारताला हा महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. त्यामुळे भारतीय संघ आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कालच इंग्लंडनं आपल्या प्रतिस्पर्ध्यावर 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवून स्पर्धेत प्रवेश केला होता, मात्र या सामन्यात त्यांना यश मिळू शकलं नाही.

November 17, 2024 7:43 PM November 17, 2024 7:43 PM

views 31

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताची जपानवर मात

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज भारताने आज जपानवर ३-० अशी मात करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. बिहारमध्ये राजगीर इथं हा सामना झाला. भारताच्या नवनीत कौर आणि दीपिका कुमारी यांनी आपल्या खेळाची कमाल दाखवत हा विजय मिळवून दिला. आता या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मंगळवारी पुन्हा भारताच्या संघाची लढत जपानशी होणार आहे.

October 29, 2024 1:34 PM October 29, 2024 1:34 PM

views 19

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८ ते १५नोव्हेंबर या कालावधीत चार टी-20 सामने खेळणार आहे. विद्यमान राष्ट्रीय प्रशिक्षक, गौतम गंभीर  बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेसाठी  ऑस्ट्रेलियाला जाणार असल्यामुळे या दौऱ्यासाठी लक्ष्मण यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं बीसीसीआयच्या पत्रकात म्हटलं आहे.

August 6, 2024 7:04 PM August 6, 2024 7:04 PM

views 1

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचा अंतिम फेरीत प्रवेश

  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. पात्रता फेरीत ब गटातून पहिल्याच प्रयत्नात त्यानं ८९ पूर्णांक ३४ शतांश मीटर इतका लांब भाला फेकला. या हंगामातली नीरजची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.  महिलांच्या ५० किलो वजनी गटातल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटनं उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानं ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं तिचं स्वप्न कायम आहे. विनेशनं उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओकसाना लिवाच हिला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी उपउपांत्यपूर्व फेरीत विन...