March 27, 2025 1:43 PM March 27, 2025 1:43 PM
7
चहा निर्यातीमधे भारत दुसऱ्या क्रमांकावर
चहा निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारताने दुसरं स्थान मिळवलं आहे. भारतीय चहा बोर्डाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते की, गेल्या वर्षभरात भारताने २५कोटी ५० लाख टन चहाची निर्यात केली, जो गेल्या १० वर्षातला उच्चांक आहे. या निर्यात वाढीमुळे भारताने श्रीलंकेला मागं टाकलं असून एकूण निर्यातीत १० टक्के वाटा भारताचा आहे. पहिल्या स्थानावर केनिया आहे. जगातल्या २५ देशांमधे भारतातून चहा निर्यात केला जातो. त्यात अंयुक्त अरब अमिराती, इराक, इराण, रशिया, अमेरिका आणि युके हे महत्त्वाचे खरेदीदार आहेत....