December 7, 2024 8:26 PM
17
देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाला आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते हरयाणात पंचकुला इथं प्रारंभ झाला. देशातली ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या मिळून ३४७ जिल्ह्यांत आजपासून १०० दिवस ही मोहिम राबवली जाणार आहे. यात क्षयरोगाविषयी जनजागृती करणं आणि क्षयरोगाबद्दलच्या गैरसमजुती दूर करणं यांचा समावेश आहे. २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही असं नड्डा त्यांनी सांगितलं. क्षयरोगरुग्णांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योज...