December 13, 2024 8:02 PM December 13, 2024 8:02 PM

views 9

देशात क्षयरोग ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने घट – राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

राष्ट्रीय धोरणात्मक योजनांच्या अंमलबजावणीमुळे देशात क्षयरोग ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. पुढच्या वर्षापर्यंत देशभरातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य आहे, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. भारतात २०१५मध्ये क्षयरुग्णांच प्रमाण दर एक लाखामागे २३७ इतकं होतं. हे प्रमाण २०२३मध्ये दर एक लाखामागे १९५ इतकं घटलं आहे. तसंच, २०१५मध्ये क्षयरोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दर एक लाखामागे २८ इतकी होती. ती ...

December 7, 2024 8:26 PM December 7, 2024 8:26 PM

views 8

देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाला आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते हरयाणात पंचकुला इथं प्रारंभ झाला. देशातली ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या मिळून ३४७ जिल्ह्यांत आजपासून १०० दिवस ही मोहिम राबवली जाणार आहे. यात क्षयरोगाविषयी जनजागृती करणं आणि क्षयरोगाबद्दलच्या गैरसमजुती दूर करणं यांचा समावेश आहे. २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही असं नड्डा त्यांनी सांगितलं. क्षयरोगरुग्णांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योज...

November 4, 2024 1:50 PM November 4, 2024 1:50 PM

views 8

भारतातील क्षयरोग रुग्ण संख्येत 17 टक्क्यांची घट

भारताने २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या कालावधीत देशातील क्षयरोगाचं प्रमाण सुमारे १७ टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, क्षयरोगाचा प्रसार कमी करण्यासाठी देशाने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.   'क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये झालेली घट हे भारताच्या समर्पित आणि अभिनव प्रयत्नांचे फलित आहे. सामूहिक भावनेच्या माध्यमातून, आपण क्षयरोगमुक्त भारतासाठी कार्य करत राहू.' असं प्रधानमंत्र्यांनी समाजमध्यमांवरील संदेशांत म्हंटलं आहे.

October 10, 2024 4:35 PM October 10, 2024 4:35 PM

views 12

रत्नागिरी जिल्ह्यातली ४२ गावं क्षयरोगमुक्त

रत्नागिरी जिल्ह्यातली ४२ गावं क्षयरोगमुक्त झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल या ग्रामपंचायतींचा सत्कार केला. २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे, त्यानुसार क्षयरोगमुक्त पंचायत ही मोहीम राबवली जात आहे. या सर्व ग्रामपंचायतींनी यात सक्रीय सहभाग घेत मोहीम यशस्वी केली.

October 8, 2024 2:48 PM October 8, 2024 2:48 PM

views 13

क्षयरोग रूग्णांच्या पोषण आहार सहाय्य निधीत वाढ

क्षयरोग रूग्णांचा पोषण आहार वाढवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे दिलं जाणाऱं पोषण आहार सहाय्य ५०० रुपयांवरुन एक हजार रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत नी-क्षय मित्र उपक्रमाच्या विस्ताराला आणि क्षयरोग रुग्णांच्या कुटुंबांचाही या योजनेत समावेश करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व क्षयरोग रुग्णांना आता नि-क्षय पोषण योजने अंतर्गत ३ हजार ते ६ हजार रुपयांपर...